COVID19 Vaccine च्या दुसऱ्या डोसवेळी वेगळीच लस दिल्यास काय होईल? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

अशातच सरकारकडून लसीकरणाचा वेग वाढवण्यावर प्रयत्न केला जात आहे.

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने बहुतांश राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशातच सरकारकडून लसीकरणाचा वेग वाढवण्यावर प्रयत्न केला जात आहे. याच दरम्यान लसीकरणावेळी अपुऱ्या पडणाऱ्या लसींमुळे त्याचा वेग मंदावला जात आहे. काही लोकांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला असून त्यांना आता दुसरा डोस म्हणजेच कोविशिल्ड घेऊ शकतात का? तसेच काही लोकांना पहिला डोसवेळी कोविशिल्डची लस दिली आहे त्यांनी आता काही प्रश्न पडत आहेत. त्यानुसार त्यांना असा प्रश्न पडला आहे की, रशियाच्या Sputnik-V लस दुसरा डोस म्हणून घेऊ शकतात का?

आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी एका प्रेस कॉन्फ्रन्सिंगच्या वेळी असे म्हटले की, कोविडच्या लसीकरणावेळी दुसरी लस दिली गेल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही. पण अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले की, भारात कोविड19 च्या दुसऱ्या लाटेचा अद्याप प्रादुर्भाव असून तो थोडा कमी होत आहे.(Aspergillosis Infection: ब्लॅक, व्हाइट अणि येलो फंगसनंतर आता 'एस्परगिलोसिस' संसर्गाचा धोका; Vadodara मध्ये 8 रुग्ण आढळल्याने वाढली चिंता)

त्यांनी पुढे असे म्हटले की, कोविड19 ची चाचणी काही पटींनी वाढवण्यात आली आहे. मात्र तीन आठवड्यात भारतात आठवड्याभरातील संक्रमणाचा आकडा खाली आल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात 24 राज्यात कोविड19 च्या रुग्णांमध्ये घट झाली हे. भारतात सध्या 20 दिवसात कोविड19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे.(Third Party App च्या माध्यमातून होणार लसीकरणासाठी स्लॉट बुक, सरकारकडून COWIN API साठी नव्या गाईडलाइन्स जाहीर)

दरम्यान, सिद्धार्थनगर मध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. जिल्ह्यातील बढनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणादरम्यान 20 लोकांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला. तर दुसरा डोस कोवॅक्सिनचा दिला गेला. प्रशासनाकडून या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.