COVID-19 Treatment: कोरोना व्हायरस उपचारांसाठी ICMR व Biological E. चे मोठे यश; विषाणूविरुद्धचा प्रतिकार वाढविण्यासाठी तयार केला Antisera
Limited) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना विषाणूचा (Coronavirus) उपचार करण्यासाठी आणि त्या बाबतचा प्रतिकार वाढविण्यासाठी अँटीसेरा (Antisera) तयार केले आहे.
हैदराबादस्थित (Hyderabad) बायोलॉजिकल ई लिमिटेड (Biological E. Limited) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना विषाणूचा (Coronavirus) उपचार करण्यासाठी आणि त्या बाबतचा प्रतिकार वाढविण्यासाठी अँटीसेरा (Antisera) तयार केले आहे. हे प्राण्यांमध्ये तयार केले गेले आहे, ज्याद्वारे मानवी शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार होतील. आयसीएमआरने नमूद केले आहे की, यापूर्वी रेबीज, हिपॅटायटीस बी, व्हॅक्सिनिया विषाणू, टिटॅनस, बोटुलिझम आणि डिप्थीरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरियातील संक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वैद्यकीय शास्त्रात अशाच उपायांचा उपयोग केला गेला आहे.
आयसीएमआर द्वारे नोंदवले गेले आहे की, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा इतर रुग्णांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याच्या उद्देशाने वापरले जात आहेत. मात्र त्याचा प्रभाव एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत बदलत जातो. म्हणूनच ही थेरपी रुग्णांसाठी विश्वसनीय क्लिनिकल साधन नाही. मात्र सेरा आधारित उपचार हा आयसीएमआर चा एक चांगला उपक्रम आहे. आयसीएमआरचा हा नवा शोध भारतातील सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी केलेले एक मोठे यश आहे. जगात कोविड-19 संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी सर्वजण लसीची आतुरतेने वाट पाहत असताना, ही घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा: भारतासाठी सप्टेंबर महिना ठरला घातक; कोरोना व्हायरस संक्रमित 33% रुग्णांचा मृत्यू, एकाच महिन्यात सर्वाधिक 41% नागरिक COVID 19 पॉझिटीव्ह)
दरम्यान, आयसीएमआरने दुसर्या सेरो सर्व्हेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, देशातील प्रत्येक 15 नागरिकांपैकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या दुसर्या सेरो सर्व्हेच्या अहवालानुसार, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याच्या अधिक घटना घडल्या आहेत. अहवालानुसार कोरोनाची 15.6 टक्के प्रकरणे शहरी झोपडपट्ट्यांमधून समोर आली आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टीबाहेरील इतर शहरी भागांतही 8.2 टक्के रुग्ण आढळले आहेत.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, जगातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 33.8 दशलक्षांच्या पुढे गेली आहे व मृत्यूंची संख्या 1,012,900 झाली आहे. गुरुवारी एकूण 33,874,283 रुग्ण आढळून आले.