COVID-19 Treatment: केंद्र सरकार कडून कोविड 19 च्या उपचारपद्धतीसाठी नवी नियमावली जारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या Joint Monitoring Group (DGHS) आणि ICMR-COVID-19 National Task Force, एम्स कडून आज नवी उपचर पद्धतींची नियमावली जारी करण्यात आली आहे.

Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये वाढत्या कोविड 19 रूग्णांच्या संख्येचा विचार करता केंद्र सरकारने कोविड 19 उपचार पद्धतीमध्ये बदल केले आहे. त्याची नवी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. नव्या गाईडलाईन मध्ये आता Molnupiravir चा उल्लेख नाही तसेच Remdesivir आणि Tocilizumab यांचा वापर केवळ विशिष्ट नियमांसाठीच केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या Joint Monitoring Group (DGHS) आणि ICMR-COVID-19 National Task Force, एम्स कडून आज नवी उपचर पद्धतींची नियमावली जारी करण्यात आली आहे.

कोविड 19 च्या ज्या रूग्नांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणं आहेत. श्वासाला त्रास होत नाही किंवा hypoxia नाही अशांना घरीच आयसोलेट केले जाईल. घरात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन असेल. सौम्य लक्षणं असणार्‍यांना खूप ताओ, श्वासाला त्रास किंवा 5 दिवसांपेक्षा अधिक खोकल्याचा त्रास जाणवत असल्यासच त्यांना वैद्यकीय घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

मध्यम स्वरूपाच्या कोविड लक्षणांमध्ये ज्यात dyspnea किंवा SP02 ची पातळी 90-93% असेल त्यांना क्लिनिकल वॉर्ड मध्ये दाखल केले जाईल व कोविडवर उपचार केले जातील. अशांना ऑक्सिजन असिस्टंन्स दिला जाईल.

गंभीर स्वरूपाच्या कोविड रूग्णांमध्ये ज्यांची SP02 पातळी 90% पेक्षा कमी असेल त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले जाईल. त्यांना mechanical ventilation वर ठेवले जाईल.

इथे पहा सविस्तर नियमावली

दरम्यान भारतामध्ये आज  2,58,089 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत. सध्या देशात 16,56,341 सक्रिय कोरोनारूग्ण आहेत. पण आजची दिलासादायक बाब म्हणजे मुंबई आणि दिल्ली शहरामध्ये नव्या रूग्णांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे.