Coronavirus New Variant: भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट, 7 दिवसातच होते शरीरातील वजन कमी
त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. तर भारतात सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सर्वांना मोठा फटका बसला आहे.
Coronavirus New Variant: जगभरात अद्याप बहुतांश ठिकाणी कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. तर भारतात सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सर्वांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता भारतात कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळला आहे. यामध्ये व्यक्तीचे वजन अवघ्या 7 दिवसात कमी होते. यापूर्वी हा व्हेरियंट ब्राझील येथे आढळून आला होता. मात्र आता भारतात सध्या अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले आहे.(Liberalised Vaccine Policy: कोरोना लसीकरण धोरणावरील आरोप केंद्र सरकारने फेटाळले म्हटले, 'लस वाटपातील असमानतेचा आरोप आधारहीन')
ब्राझील येथून कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट भारतात आले आहेत. तर दुसऱ्या व्हेरियंटचे नाव बी.1.1.28.2 असे आहे. या व्हेरियंटचे परिक्षण एका उंदरावर करण्यात आले. त्यामधून असे समोर आले की, याची लागण होताच अवघ्या सात दिवसातच वजन कमी होते. तसेच हा नवा व्हेरियंट ऐवढा भयंकर आहे की डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हा सुद्धा शरीरातील अँटीबॉडीज क्षमता कमी करतो.
तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा याचा फटका बसणार असल्याची आधीच सुचना दिली गेली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाची काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे. या नव्या स्ट्रेनमुळे 2-3 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. सरकारकडून प्रथमच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर अभ्यास करण्यासाठी गाईडलाइन्सवर काम करण्यास सुरुवात केली आहे.(Covid-19 Vaccination in India: भारतात 17 कोटींहून अधिक लोकांनी घेतला कोविड-19 लसीचा पहिला डोस; लसीकरणात अमेरिकेला टाकले मागे)
दरम्यान, भारतात कोरोनाचे आणखी 1,14,460 रुग्ण आढळले असून 1,89,232 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर 2677 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा 2,88,09,339 वर पोहचला असून 14,77,799 अॅक्टिव रुग्ण आहेत.