इटली येथे फसलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडे No-Corona सर्टिफिकेट नसल्याने मायदेशी येणे मुश्किल
बहुतांश देशांनी पर्यटकांना येण्यास सुद्धा बंदी घातली आहे. तसेच विमानांचे उड्डाण सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी येणे अधिकच मुश्किल झाले आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बहुतांश देशांनी पर्यटकांना येण्यास सुद्धा बंदी घातली आहे. तसेच विमानांचे उड्डाण सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी येणे अधिकच मुश्किल झाले आहे. भारतातील काही विद्यार्थी आणि पर्यटक इटली येथे अडकले आहेत. रोम येथील विमानतळावर भारतीय विद्यार्थी अडकले असून ते मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, एअर इंडिया यांनी असे स्पष्ट केले आहे की, जो पर्यंत एखादा प्रवासी नो-कोरोना व्हायरस (No-Coronavirus Certificate) सर्टिफिकेट दाखवत नाही तो पर्यंत त्यांना विमानात प्रवेश नाकारला जाणार आहे.
तर विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, इटली येथील डॉक्टर स्थानिकांना उपचार देण्यात व्यस्त आहेत. याच कारणास्तव इटली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी हैरदबादचे कार्यकर्ता अमजेद उल्लाख खान यांच्यासोबत संपर्क केला असून त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमोर खान यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे आता इटली येथील भारतीय दूतवास अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधू शकतात.(कोरोना व्हायरसमुळे एअर इंडियाची रोम, मिलान आणि सिओल येथील उड्डाणे रद्द)