Indian Railway: कोरोना काळात भारतीय रेल्वेला फटका, उद्यापासून 'या' 16 विशेष रेल्वे रद्द, येथे पाहा पूर्ण यादी

या सर्व गाड्या 7 मे पासून पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

एकीकडे कोरोना काळात भारतीय रेल्वेकडून अनेक विशेष रेल्वे चालविल्या जात आहेत तर दुसरीकडे याच कोरोनाचा फटका बसल्याने कार्यान्वित असलेल्या अनेक विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व रेल्वेने 16 विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन प्रवासीच नसल्यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फटका बसत असल्या कारणाने या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द केलेल्या रेल्वेमध्ये बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या 7 मे पासून पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

विशेष रेल्वेला प्रवाशांचा ओघ नसल्याकारणाने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ईस्टर्न रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकारी ने सांगितले आहे की, कोरोना महामारी दरम्यान या विशेष रेल्वेंना हवा तसा प्रवाशांचा ओघ दिसत नाही. कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर प्रवाशांची संख्या कमी झाली. ज्यामुळे रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.हेदेखील वाचा- Lockdowns And Unemployment: लॉकडाऊन काळात 75 लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; अनेकांच्या हातांना मिळेना काम

'या' विशेष रेल्वे झाल्या रद्द

स्पेशल ट्रेन नंबर 02019 हावड़ा-रांची, 02020 रांची-हावड़ा, 02339 हावड़ा-धनबाद, 02340 धनबाद हावड़ा, 03027 हावड़ा-अजीमगंज, 03028 अजीमगंज-हावड़ा, 03047 हावड़ा-रामपुरहाट, 03048 रामपुरहाट-हावड़ा, 03187 सियालदह रामपुरहाट, 03188 रामपुरहाट-सियालदह, 03401 भागलपुर-दानापुर, 03402 दानापुर-भागलपुर, 03502 आसनसोल-हल्दिया, 03501 हल्दिया-आसनसोल

काही दिवसांपूर्वी रेल्वेने प्रवाशांच्या कमी संख्येमुळे 40% रेल्वे रद्द केल्या होत्या. उत्तर पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रेल्वे रद्द केल्या आहेत, त्यात जयपुर-दिल्ली सराय रोहिल्ला डबल डेकर मंगळवारपासून ना दिल्लीहून येणार ना ही जाणार असेही सांगण्यात आले आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बठिण्डा -लालगढ स्पेशल, लालगढ-अबोहर स्पेशल, अबोहर-जोधपुर स्पेशल, जैसलमेर-लालगढ स्पेशल, भिवानी-मथुरा स्पेशल व श्रीगंगानगर-रेवाडी स्पेशल ट्रेन यांचाही समावेश आहे. या सर्व रेल्वे पुढील आदेशापर्यंत स्थगित असतील.