'आता मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरावी लागणार नाहीत'; मंत्रीमंडळातील बदलानंतर काँग्रेसचा स्मृती इराणी यांच्यावर निशाणा
त्यामुळे आता त्या केवळ महिला व बाल विकास मंत्री आहेत. यावरुन आता काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. त्यात अनेक बदल करण्यात आले. 43 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता त्या केवळ महिला व बाल विकास मंत्री आहेत. यावरुन आता काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ता अलका लांबा (Alka Lamba) यांनी ट्विटद्वारे स्मृती इराणी यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.
काँग्रेस प्रवक्ता अलका लांबा यांनी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "चला आता स्मृती इराणी पूर्ण लक्ष महिला व बालविकास मंत्रालयावर देऊ शकतील. वस्त्रोद्योग मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलंही भरावी लागणार नाहीत. बाकी सर्व काही आता काळावर सोडून द्या." (Modi Cabinet Expansion: नव्या मंत्र्यांसह खातेवाटप जाहीर; Narayan Rane झाले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते मंत्रालय, See List)
Alka Lamba Tweet:
दरम्यान, आरोग्य खातंही डॉ, हर्षवर्धन यांच्याकडून काढून गुजरातचे मनसुख मंडाविया यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला होता. आता लसींचा तुटवडा भासणार नाही का, असा प्रश्न विचारला होता. (Modi Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला मंत्री म्हणून पदभार)
काल झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. त्यात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा समावेश आहे.