CJI DY Chandrachud On Artificial Intelligence (AI): आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड काय म्हणाले पाहा (Watch Video)

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (CJI) धनंजय वाय चंद्रचूड (Dhananjaya Y Chandrachud) यांनीदेखील एआय (AI) म्हणजे Artificial Intelligence बद्दल भाष्य केले. कटक येथील ओडिशा न्यायिक अकादमी येथे 'डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट्स आणि ई-इनिशिएटिव्ह' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना आज (शनिवार, 6 मे) ते बोलत होते.

CJI DY Chandrachud | (PC - Twitter/ANI)

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) बद्दल जगभरात चर्चा सुरु आहे. सहाजिकच भारतातही ती चर्चा आहे. दरम्यान, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (CJI) धनंजय वाय चंद्रचूड (Dhananjaya Y Chandrachud) यांनीदेखील एआय (AI) म्हणजे Artificial Intelligence बद्दल भाष्य केले. कटक येथील ओडिशा न्यायिक अकादमी येथे 'डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट्स आणि ई-इनिशिएटिव्ह' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना आज (शनिवार, 6 मे) ते बोलत होते.

सरन्यायाधीश (CJI) धनंजय वाय चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले की AI ची देखील एक स्वतंत्र बाजू आहे. भारतीय न्यायव्यवस्थेत आम्ही जी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करू इच्छितो त्यात प्रथमतः पेपरलेस न्यायालये (Paperless Courts) आणि e-initiatives आहेत. दुसरे म्हणजे, आभासी न्यायालये आणि विशेषत: दिल्ली वाहतूक चलनाच्या क्षेत्रात आभासी न्यायालयांमध्ये आघाडीवर आहेत. (हेही वाचा, CJI DY Chandrachud: न्यायालयामध्ये वकिलांना आयपॅड आणि लॅपटॉप वापरु दिले पाहिजेत- सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड)

व्हिडिओ

सर्वोच्च न्यायालयात पार पडत असलेल्या विविध खटल्यांच्या सुनावणीचे होतत असेल्या लाईव्ह प्रक्षेपणाबद्दल बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, आज बहुतेक उच्च न्यायालये लाइव्ह स्ट्रीमिंग करत आहेत. पाटणा हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या यूट्यूबवर एका आयएएस अधिकाऱ्याला त्याने योग्य पोशाख का घातला नाही हे विचारणाऱ्या किंवा गुजरात हायकोर्टातील कुणीतरी वकिलाला विचारले की तो तिच्या केससाठी तयार का नाही, असे व्हिडिओ, क्लिप पाहायाल मिळतात. न्यायमूर्ती चंद्रचूड पुढे म्हणाले, "YouTube मध्ये खूप मजेदार गोष्टी पाहायला आहेत ज्यावर आम्हाला नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण कोर्टात जे काही घते आहे ते अतिशय ही गंभीर आहे.

ट्विट

आम्ही करत असलेल्या लाइव्ह स्ट्रिमिंगला एक फ्लिपसाइड आहे. त्यामुळे आम्ही न्यायाधीशांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. जेणेकूरुन आम्ही न्यायालयात जे शब्द उच्चारतो तो सोशल मीडियाच्या युगात सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. खास करुन जेव्हा आपण घटनापीठातील युक्तिवाद लाइव्ह स्ट्रीम करतो तेव्हा आपल्याला याची जाणीव होते. बरेचदा नागरिकांना हे समजत नाही की आपण ऐकण्याच्या ओघात जे बोलतो ते संवाद उघडण्यासाठी आहे. त्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडियासह इंटरफेस न्यायाधीश म्हणून आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. आम्हाला लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी एक मजबूत क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज आहे, असेही न्यायमूर्ती चंद्रचू म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now