Chitrakoot Waterfall: मोबाईल दिला नसल्याचा राग, तरुणीचा चित्रकूट धबधब्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

हा तोच धबधबा आहे, ज्याला मिनी नायगरा म्हणूनही ओळखले जाते. सरस्वती मौर्य असे या तरुणीचे नाव आहे. ती केवळ 21 वर्षांची आहे.

Waterfall | Representational image (Photo Credits: pxhere)

Young Girl Suicide Attempts: ऐकावे ते नवलच असा सध्याचा काळ. डिजिटल क्रांती झाली मोबाईल निर्मात्यांची संख्या वाढली त्यामुळे त्याचे दर घटले आणि सामान्यांच्या हातात इंटरनेट नावाचे गारुड आले. या मायाजालाने माणसाला इतके जखडून ठेवले आहे की, तो पुरता आहारी गेला आहे. याचीच प्रचिती छत्तीसगड राज्यातील एका गावात आली. केवळ पालकांनी मोबाईल पाहायला दिला नाही येवढ्या कारणास्तव एका तरुणीने चित्रकोट (Chitrakoot Waterfall) धबधब्यात उडी घेतली. हा तोच धबधबा आहे, ज्याला मिनी नायगरा म्हणूनही ओळखले जाते. सरस्वती मौर्य असे या तरुणीचे नाव आहे. ती केवळ 21 वर्षांची आहे.

अतिरिक्त पुलिस अधीक्षक नवोदिता पाल यांनी माहिती देताना सांगितले की, सरस्वती हिला मोबाईल पाहायचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे तिचे आई-वडील तिला नेहमी टोकत असत. दरम्यान, एके दिवशी तिच्या पालकांनी तिचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली. तिने थेट चित्रकोट धबधबा गाठला आणि त्यात उडी घेतली. तिचे वडील संतो मोर्य यांनी सांगितले की, मंगळवारी (19 जुलै) आम्ही तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिला हलकासा ओरडा दिला. त्यानंतर ती दुपारी एकच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली. (हेही वाचा, Karnataka High Court: मोबाईल फोनसोबत विकल्या जाणाऱ्या चार्जरवर वेगळा कर आकारला जाऊ शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा)

पोलिसांनी पुढे सांगितले की, धबधबा पाहायला आलेल्याय लोकांनी तिला पाहिले. सुरुवातीला तिसुद्धा धबधबा पाहायला आली असावी असे त्यांना वाटले. मात्र, तिचे वर्तन काहीसे वेगळे वाटले त्यामुळे त्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणाचेही ऐकले नाही थेट धबधब्यातच उडी घेतली. पाण्यात पडल्यानंतर ती स्वत:चा बचाव करण्यासाठी पोहत किनाऱ्यावर यायचा प्रयत्न करु लागली. चित्रकोट पोलीस स्टेशनचे प्रभारी तामेस्वर चौहान यांनी सांगितले की, सरस्वतीने पाण्यात उडी घेतल्यावर गावकऱ्यांनी नावेच्या माध्यमातून तिच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तिला यशस्वीरित्या वाचवले. स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले की, अशा अनेक घटना घडतात. काही कारणांमुळे कधी मनोरुग्ण स्थितीमुळे लोक येतात आणि थेट पाण्यात उड्या घेतात. त्यातील काहींना वाचविण्यात यश मिळते काहींचे प्राण जातात.