Child Pornography Racket: 50 मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह फोटो आणि व्हिडिओ Dark Net वर विकणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला CBI कडून अटक

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातीस सिंचन डिपार्टमेंट मधील एका व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. हा सदर व्यक्ती गेल्या 10 वर्षांपासून मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांचे विचित्र पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ डार्क वेब वर विक्री करत होता. हे फोटो आणि व्हिडिओ फक्त राज्यापूर्तीच नव्हे तर जगभरात विक्री केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी म्हटले आहे. त्याने 5-16 वयोगटातील जवळजवळ 50 मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून ते सर्वजण चित्रकूट, बांदा आणि हामरीपूर येथील आहेत.(Jamshedpur Rape: धक्कादायक! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक; जमशेदपूर येथील घटना)

आरोपीला बांदा येथून अटक करण्यात आली असून त्याला लवकरच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. सीआयने तपासात आठ मोबाईल फोन, लाखांची रोकड, सेक्स टॉइज, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल गोष्टी ज्या बाललैंगिक शोषणासाठी वापरल्या जातात त्या जप्त केल्या आहेत.

कनिष्ठ अभियंता ही गोष्ट गेल्या 10 वर्षांपासून करत असून तो चाईल्ड पोनोग्राफीचे फोटो आणि व्हिडिओ जगभरात डार्क वेब आणि क्लाउड सर्विसच्या माध्यमातून विक्री करत होता.(Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपी अटकेत)

 तपास करणाऱ्यांना त्याने सांगितले की, मुलांना तो लाच देण्यासह मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा देत असे. तसेच त्यांना तोंड बंद करण्यास सुद्धा सांगितले जात असे.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif