Jamshedpur Rape: धक्कादायक! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक; जमशेदपूर येथील घटना
झारखंड (Jharkhand) येथील जमशेदपुर (Jamshedpur) जिल्ह्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने जमशेदपुर येथे एकच खळबळ माजली आहे.
झारखंड (Jharkhand) येथील जमशेदपुर (Jamshedpur) जिल्ह्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने जमशेदपुर येथे एकच खळबळ माजली आहे. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पीडित मुलगी बाहेर खेळायला गेली असताना आरोपीने तिला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
जमशेदपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी संबंधित मुलीवर बलात्कार झाला होता. परंतु, पीडित मुलीचे वडील ड्राईव्हर बाहेर असल्यामुळे पोलिसांत उशीरा तक्रार दाखल करण्यात आली. ज्या घरात ते राहतात तिथेच आरोपी आपल्या कुटंबियांसोबत राहत होता. 4 नोव्हेंबर रोजी पीडित बाहेर खेळायला गेली असताना आरोपीने तिला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी आणि त्याचे वडील फरार होते. परंतु, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपी अटकेत
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या ही संपूर्ण देशासाठी चिंताजनक बाब आहे. हाथरसच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे इतर राज्यातही दिशा कायदा समंत करण्यात जावा, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2020 12:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

