Online Rummy खेळताना गमावला Cancer Treatment Funds; चेन्नई येथील तरुणाची आत्महत्या
कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी ठेवलेले पैसे त्याने या खेळात गमावल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
कर्करोगग्रस्त आईच्या वैद्यकीय (Cancer Treatment Fund) उपचारासाठी जतन केलेले 30,000 रुपये ऑनलाइन रम्मी (Online Rummy) गेम खेळात गमावल्याने चेन्नई येथील एका तरुणास मोठा धक्का बसला. ज्या धक्क्यातून हा तरुण सावरु शकला नाही. इतकेच नव्हे तर त्याने आत्महत्या करुन स्वत:चे आयुष्यही संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकाश असे या तरुणाचे नाव असून, तो 26 वर्षांचा आहे. तो केटरिंग डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करतो. त्याला ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद (Online Rummy Addiction) होता. या घटनेनंतर तामिळनाडू (Tamil Nadu Suicides) राज्यातीतील ऑनलाईन जुगाराबाबत (Online Gambling Laws) चिंता अधिक वाढली आहे.
महामारीच्या काळात सुरू झालेले व्यसन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश या तरुणाच्या वडिलांचे आगोदरच निधन झाले आहे. त्यामुळे तो वडिलांच्या पश्चात आपली कर्करोगक्रस्त आई आणि धाकट्या भावासोबत राहतो. दरम्यान, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात त्याला आणि त्याच्या धाकट्या भावालाही ऑनलाईन रम्मी खेळण्याचे प्रचंड व्यसन लागले होते.दरम्यान, कर्करोग झालेल्या आईच्या उपचारासाठी ठेवलेले पैसे वापरुन त्याने ऑनलाईन रम्मी खेळताना 30,000 रुपये गमावले. आईने या पैशांबाबत त्याला विचारले असता त्याने आपण हे पैसे ऑनलाईन रम्मी खेळात गमावले असल्याची कबुली दिली. पण, त्यानंतर तो मनातून पुरता हादरुन गेला. (हेही वाचा, Shocking! 'बाबा माझे कर्ज तुम्ही फेडा'; ऑनलाइन जुगाराच्या कर्जाला कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या)
मुलाचे वागणे पाहून आईने त्याला ओरडा दिला. दरम्यान, आईच्या उपचारावरील पैसे ऑनलाईन खेळात गमावल्यामुळे तरुणाला इतका पश्चाताप झाला की, तो अपराधीपण मनात धरुन अचानक गायब झाला. बराच काळ परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला असता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आला. चेन्नईतील कोट्टुपुरम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
ऑनलाईन जुगार तामिळनाडूमध्ये एक व्यापक समस्या
दरम्यान तरुणाची आत्महत्या ही घटना तामिळनाडूमधील ऑनलाइन जुगारांशी संबंधित मोठ्या शोकांतिकेचा एक भाग आहे. गेल्या चार वर्षांत, ऑनलाइन सट्टेबाजीच्या अॅप्सचे व्यसन आणि कर्जाच्या फसवणुकीमुळे 48 व्यक्तींनी आपला जीव गमावल्याचे वृत्त आहे. तामिळनाडू ऑनलाइन गेमिंग प्राधिकरण (TNOGA) या धोक्याला आळा घालण्यासाठी काम करत आहे. 2022 च्या टीएनओजीए कायद्यांतर्गत, ऑनलाइन जुगार, सट्टेबाजी आणि संधीचा खेळ प्रतिबंधित आहे, ज्याचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ₹5,000 पर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. वित्तीय संस्था आणि पेमेंट गेटवे यांनाही अशा उपक्रमांसाठी व्यवहार सुलभ करण्यास मनाई आहे.
याव्यतिरिक्त, टीएनओजीए ने राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. नागरिकांना बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग क्रियाकलापांची तक्रार करण्यास किंवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाद्वारे किंवा ईमेलद्वारे नियमनावरील सूचना देण्यास प्रोत्साहित केले जाते.
राजकीय पक्षांकडनही चिंता व्यक्त
पट्टाली मक्कल काची (पीएमके) चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अंबुमणि रामदास यांनी राज्य सरकारला रम्मीसारख्या ऑनलाइन गेम्सच्या विरोधात प्रयत्न तीव्र करण्याची विनंती केली आहे. अनेक तरुणांना नैराश्य आणि आत्महत्येकडे ढकलणाऱ्या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.