Chennai Shocker: बयकोसोबत भांडण झाले म्हणून व्यक्तीने केली 7 वर्षीय मुलीची हत्या

चेन्नई येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे बायकोसोबत भांडण झाले म्हणून चक्क त्याच्या 7 वर्षीय मुलीची हत्या केली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

Chennai Shocker:  चेन्नई येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे बायकोसोबत भांडण झाले म्हणून चक्क त्याच्या 7 वर्षीय मुलीची हत्या केली आहे. आरोपीचे नाव राधाक्रिष्ण असे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची बायको लावण्या ही नर्स असून ती एका खासगी रुग्णालयात काम करते. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ती रुग्णालयात होती.(Haryana: कोर्टाच्या बाहेर झालेल्या वादानंतर महिलेला इमारतीवरुन फेकले, 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)

आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, आरोपीने घरी येत मुलीला लावण्याबद्दल विचारले. परंतु मुलीने त्याला नीट उत्तर दिले नाही. त्यामुळे राधाक्रिष्ण हा संतप्त होत त्याने किचन मध्ये जाऊन चाकूने हल्ला करत तिची हत्या केली.(Shocking! 11 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; आरोपी फरार, बलात्काराचा गुन्हा दाखल)

आरोपीने हत्या केल्याने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तशीच पडून होती आणि आरोपीने तेथून निसटून गेला. शेजाऱ्यांची मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकत तिच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांनी मुलीची अवस्था पाहून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार राधाक्रिष्णन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे. तसेच या प्रकरणी अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement