IPL Auction 2025 Live

C-DAC चा अनागोंदी कारभार! चार परीक्षा घेऊन केल्या रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

यामुळे विद्यार्थी खूपच भांबावले असून हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

Result (Photo Credits: PTI)

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात. मात्र अशातच कळलं की त्या परीक्षा रद्द झाल्या असून आता नव्याने परीक्षा द्यावे लागणार तर? यामुळे विद्यार्थ्यांचे किती नुकसान होते याची कल्पना न केलेलीच बरी.. मात्र C-DAC ने हा सावळा गोंधळ केला आहे. C-DAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलप्मेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग. ही संस्था पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी चार परीक्षा यापूर्वीच विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या. मात्र आता ही परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थी खूपच भांबावले असून हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, C-DAC साठी यापूर्वी चार वेळा परीक्षा घेण्यात आली. यापैकी तीन परीक्षा टेक्निकल समस्येचं कारण देत रद्द करण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी चार वेळा परीक्षा दिली. चौथ्यांदा C-DAC परिक्षेचा निकाल जाहीर केला, रँकनंतर कॉलजही अलॉट केले. पण, अॅडमिशन प्रक्रिया मधेच थांबवून नंतर ती रद्द केली. यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.हेदेखील वाचा- Sarkari Naukari: RBI ते AIIMS मध्ये नोकरीची संधी; पहा कधी,कुठे कराल अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षेला 1200 विद्यार्थी बसले होते. यापैकी काहींनी चार वेळा तर काहींनी तीन वेळा ही परीक्षा दिली. आता पाचव्यांदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी खूपच हैराण झाले असून विदयार्थ्यांमधून प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे. हा प्रकार फारच संतापजनक असून याची चौकशी केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

याला कोण जबाबदार आहे, असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी हातातली नोकरी सोडून या परिक्षेसाठी तयारी केली. आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.