Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील अलिगडमधील यमुना एक्सप्रेसवेवर बस आणि ट्रकची धडक; 5 ठार, 15 जखमी

गुरुवारी मध्यरात्री जिल्ह्यातील टप्पल परिसरात हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, खासगी बस दिल्लीतील काश्मिरी गेट येथून पूर्व उत्तर प्रदेशातील आझमगडकडे जात होती.

Accident on Yamuna Expressway (फोटो सौजन्य -IANS)

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Expressway) बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात (Accident) 15 जण जखमी झाले. अलीगढजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. गुरुवारी मध्यरात्री जिल्ह्यातील टप्पल परिसरात हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, खासगी बस दिल्लीतील काश्मिरी गेट येथून पूर्व उत्तर प्रदेशातील आझमगडकडे जात होती. ही बस ज्या ट्रकला धडकली, त्या ट्रकमध्ये काचेच्या वस्तू होत्या.

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. बसमध्ये अडकलेल्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा - Telangana Road Accident: तेलंगणामध्ये नगरकुर्नूल इथं ट्रॅक्टरला धडकल्यानंतर स्कूल बस उलटली; 5 विद्यार्थी जखमी (Watch Videos))

पाच महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू -

हा अपघात एवढा भीषण होता की, बसचा काही भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना बसमधून बाहेर काढले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्यामध्ये एक महिला आणि पाच महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. ही बस अयोध्येहून दिल्लीमार्गे आझमगडला जात होती. मृतांची ओळख पटवली जात आहे. (Bengaluru Auto Driver: बेंगळुरू येथील ऑटो चालकाने स्टार्टअपसाठी निधी उभारण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, सोशल मिडीयावर होत आहे कौतुक)

यमुना एक्सप्रेसवेवर बस आणि ट्रकची धडक, पहा व्हिडिओ - 

तथापी, पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. पाच मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. यासंदर्भात अलीगढ पोलिसांनी एक्सवर माहिती दिली आहे. याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif