Motivational Story Of Brigadier: डॉक्टर म्हणाले 'आयुष्यभर सायकल चालवू शकणार नाही'; ब्रिगेडीयरने केला 'कश्मीर ते कन्याकुमारी' Bicycle प्रवास

'यापुढे आुष्यात कधीच सायकल चालवता येणार नाही. त्यामुळे सायकल विसरुन जा', असा सल्ला एका डॉक्टरांनी ब्रिगेडीला दिला. पण, डॉक्टरांनी केलेले भाष्य आणि दिलेला सल्ला धुडकावत एका ब्रिगेडीयरने चक्क कन्याकुमारी ते दिल्ली असा तब्बल 3600 किलोमीटचे अंतर कापले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे अंतर सायकलवरुन पार केले आहे.

Bicycle Riding | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Inspirational Story Of Brigadier: मनामध्ये जिद्द, अंगात जिंद्द आणि डोळ्यासमोर ध्येय, असेल तर कोणतीही लढाई, कोणत्याही परिस्थितीत जिंकता येते. गरज असते ती, फक्त मनाच्या तयाराची आणि संकटाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची. ब्रिगेडीयर एनएस चराग यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. एका हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणात दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने ते रुग्णालया दाखल झाले होते. त्यांचे आतडे फाटले होते, सर्वांगावर जखमा आणि अंतर्गत रस्तस्त्रावही झाला होता. दोन्ही पायांची हाडे मोडली होती. इतर अवयवांनाही धक्का पोहोचला होता. त्यामुळे ते 1ऑगस्ट रोजी रांची येथील रुग्णालयात दाखल झाले होते. काही महिने उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देताना डॉक्टारांनी सांगितले 'ब्रिगेडीयर साहेब यापूढे सायकल चालवने विसरा. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच सायकल चालवू शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे ही अट आयुष्यभर पाळायची आहे.

कन्याकुमारी ते दिल्ली 3600 किलोमिटरचा सायकल प्रवास

'लष्कारात आर्मि ऑफिसर राहिलेले ब्रिगेडीयर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सक्रीय झाले. त्यांनी एनसीसी गर्ल्स केडेट्सच्या 13 जणांच्या तुकडीचे नेतृत्व करत त्यांनी कन्याकुमारी ते दिल्ली (Kashmir to Kanyakumari) असा तब्बल 3600 किलोमिटरचा सायकल प्रवास केला. ज्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यात दम नसल्याचे दाखवून दिले. (हेही वाचा, Crime: सायकल चोराला पोलिसांनी घातल्या बेड्या, 6 लाख रुपये किमतीच्या 54 सायकली जप्त)

प्रवास माझ्यासाठी एक मैलाचा दगड

ब्रिगेडीयर एनएस चराग यांनी या आव्हानात्मक प्रवासाबद्दल 'टीओआयशी' बोलताना सांगितले की, 'मी केलेला प्रवास माझ्यासाठी एक मैलाचा दगड आहे. जो मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. कारण, मला आजही डॉक्टरांचे ते शब्द मला आठवतात. माझ्या कानात ते घुमतात. ''तुम्ही आयुष्यात कधीच सायकल चालवू शकणार नाही" पण मी चालवली.' ब्रिगेडीयर सध्या बडोदा येथील एनसीसी ग्रुप हेडकॉर्टरमध्ये सक्रीय आहेत. (हेही वाचा, Desi Jugaad Bullet Video: विनापेट्रोल चालणारी बुलेट, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यालाही फायदा; पाहा व्हिडिओ)

अनपेक्षीत घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण

ब्रिगेडीयर यांनी पुढे बोलताना सांगितले की, एनसीसी संचालनालयाची सायकल मोहिमेची सुरुवातीची योजना रिले सायक्लोथॉन होती. ज्यामध्ये त्यांना केवळ सहभागी होण्याचीच नव्हे तर चक्क नेतृत्व करण्याची ऑफर मिळाली. ते म्हणाले, "मी कॅडेट्सची निवड केली. कोणताही धोका, अनपेक्षीत घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले आणि पथकाची निवड केली."

लढवय्याचा प्रवास आपल्या चमुसोबत 8 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथील दमट वातावरणात सुरू झाला. 23 जानेवारी रोजी त्यांनी प्रवास पूर्ण केला ते दिल्लीला पोहोचले. दिल्ल्लीला पोहोचले तेव्हा ते नवी दिल्ली परिसरात 3°C तापमानात पेडलिंग करत होते. "आम्ही देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून दिल्लीपर्यंत 18,000 मीटरची उंची 33 राइडिंग दिवसांत पूर्ण केली. आमच्या प्रवासाचा प्रतिदिन सरासरी वेग 108km होता, असे त्यांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now