Blinkit Introduces Ambulance Service: आता अवघ्या 10 मिनिटांत उपलब्ध होणार रुग्णवाहिका; ब्लिंकिटने सुरु केली खास सेवा, जाणून घ्या सविस्तर

कंपनी सुरुवातीला सर्व जीवन वाचवणाऱ्या उपकरणांनी सुसज्ज बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका पुरवत आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, एक स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर (AED), एक स्ट्रेचर, एक मॉनिटर, एक सक्शन मशीन आणि आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन यांचा समावेश आहे.

Blinkit Introduces Ambulance Service

क्विक कॉमर्सने भारतात वेगळी गती घेतली आहे. पारंपारिक ई-कॉमर्स मागे टाकत अनेक कंपन्या अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये वस्तू पुरवत आहेत. क्विक कॉमर्स सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत, ब्लिंकिटने गुरुग्राममध्ये 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ब्लिंकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अलबिंदर धिंडसा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे, त्यामुळे आता गुरुग्राममध्ये तुम्ही ब्लिंकिट ॲपवर 10 मिनिटांत रुग्णवाहिका बुक करू शकाल.

धिंडसा म्हणाले की, कंपनीने आज गुरुग्राममध्ये पाच रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. इतर भागातही ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे. धिंडसा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आजपासून गुरुग्रामच्या रस्त्यांवर आमच्या पाच रुग्णवाहिका असतील. आम्ही. तुम्हाला @letsblinkit ॲपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय दिसेल.

कंपनी सुरुवातीला सर्व जीवन वाचवणाऱ्या उपकरणांनी सुसज्ज बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका पुरवत आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, एक स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर (AED), एक स्ट्रेचर, एक मॉनिटर, एक सक्शन मशीन आणि आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन यांचा समावेश आहे. धिंडसा म्हणाले की, प्रत्येक रुग्णवाहिकेत प्रशिक्षित पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक ड्रायव्हर असतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत चांगली सेवा मिळेल. (हेही वाचा: New Year’s Eve Celebration: 'नववर्षाच्या पूर्वसंध्येला' Blinkit वर कंडोमच्या 1,22,356 पाकिटांची ऑर्डर; आलू भुजिया, इनो, लिपस्टिकसह अनेक वस्तूंची झाली विक्री)

Blinkit Introduces Ambulance Service: 

या सेवेमुळे नफा मिळवण्यापेक्षा परवडण्यावर भर दिला जाईल, असे धिंडसा यांनी सांगितले. गंभीर समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून या उपक्रमात गुंतवणूक करण्याची ब्लिंकिटची योजना आहे. दरम्यान, ब्लिंकिट सतत आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने Zepto Café शी स्पर्धा करण्यासाठी 10-मिनिटांचे खाद्य वितरण ॲप बिस्ट्रो लाँच केले. कंपनीने गेल्या वर्षी घरोघरी प्रिंटआउट सेवा सारख्या सेवा सुरू केल्या होत्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now