Bihar: नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, मुलीची हत्या केल्यानंतर बायकोचा आत्महत्येचा प्रयत्न

ऐवढेच नाही तर महिलेने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला.

Representational Image | (Photo Credits: PTI)

बिहार मध्ये नवऱ्यासोबत भांडण झाले म्हणून बायकोने आपल्या 8 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐवढेच नाही तर महिलेने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सध्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Nikita Tomar Murder Case: निकिता तोमर हत्याकांड प्रकरणातील दोषी तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा; फरीदाबाद न्यायालयाचा निर्णय)

संपूर्ण प्रकरण मुफस्सिल थाना क्षेत्रातील चिलमारा गावातील आहे. येथील पोलिसांनी असे म्हटले की, जखीरा खातून असे महिलेचे नाव आहे. महिलेला संशय होता की, नवरा मोहम्मद याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सरु आहे. शुक्रवारी याच कारणास्तव दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर जरीना खातून हिने स्वत: सह आपली 8 वर्षांच्या मुलीला एका खोलीत बंद केले. संतप्त झालेल्या महिलेने मुलीची गळा दाबून हत्या केली.

एसएचओ रणजीत कुमार यांनी असे म्हटले की, नवऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतमधून बंद केल्याने तो उघडला गेला नाही. त्यामुळे परिवारातील अन्य सदस्यांना बोलावले असता खिडकीतून पाहिले असता मुलीचा मृतदेह फरशीवर पडलेला दिसला. तर खातून ही बेडवर बेशुद्ध पडल्याचे दिसले.  त्याचवेळी तातडीने दरवाजा तोडून खोलीत शिरले असता दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखीरा खातून हिच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. (Tamil Nadu Assembly Elections 2021: विदेशी गायींचे दूध प्यायल्याने भारतीय महिलांनी फिगर गमावली; द्रमुक नेते Dindigul Leoni यांचे वादग्रस्त विधान)

पोलिसांनी असे म्हटले की, आरोपी महिला सध्या रुग्णालयात आहे. तर डिस्चार्ज दिल्यानंतर तिला अटक करण्यात येणार आहे. नवऱ्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवऱ्याने असे म्हटले की, त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप बायकोने लावला होता.  खातून याने 10 वर्षांपूर्वी सैफुल सह प्रेमविवाह केला होता. दोघे सुद्धा एकाच गावातील मुळ रहिवासी आहेत.