Bihar जिल्ह्यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये कर्मचार्यांना जीन्स घालण्यावर बंदी; Saran DM कडून ड्रेस कोड जारी
कोणत्याही पदावर काम करणार्या कर्मचार्याला तेव्हाही जीन्स घालण्यावर, टी शर्ट घालण्यावर बंदी घालण्यात आली होती.
बिहारच्या (Bihar) सरण (Saran) जिल्ह्यामध्ये मेजिस्ट्रेट कडून सरकारी कार्यालयामध्ये जीन्स आणि टीशर्ट घालण्याला प्रतिबंध घातला आहे. सार्या कर्मचार्यांना गळ्यात त्यांची ओळखपत्र देखील घालणं बंधनकारक केली आहेत. यामुळे कर्मचार्यांची ओळख पटवणं सुलभ होणार आहे. कर्मचार्यांना आता फॉर्मल ड्रेस घालणं आणि कामाच्या वेळेत म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत ऑफिसमध्ये राहणं बंधनकारक करण्यात आले आहे.सरकारी ऑफिस मध्ये 'वर्क कल्चर' सुधारण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात आले आहे.
District Magistrate कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विशिष्ट विभागांमध्ये सरप्राईज व्हिजिट दिल्या जाणार आहेत. आदेशांचे पालन केले जात आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंग किंवा व्हिडिओ कॉलिंग केले जाणार आहे.
कर्मचार्यांना नव्या नियमावलीचं काटेकोर पद्धतीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ड्रेस कोडच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना आहेत. जर ही नवी नियमावली मोडली तर संबंधित कर्मचार्यावर उचित कारवाई केली जाणार आहे. नक्की वाचा: महाराष्ट्र सरकारी सेवेतील कर्मचा-यांना यापुढे ऑफिसात जीन्स घालून येण्यास परवानगी, टी-शर्ट घालण्यावर मात्र बंदी .
दरम्यान अशा प्रकारच्या सूचना देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील बिहार सरकारने सचिवालयातील कर्मचार्यांना साधे, हलक्या रंगाचे आणि आरामदायक कपडे घालण्याच्या सुचना केल्या होत्या. कोणत्याही पदावर काम करणार्या कर्मचार्याला तेव्हाही जीन्स घालण्यावर, टी शर्ट घालण्यावर बंदी घालण्यात आली होती.