Bicycle Sales Increase In Lockdown: लॉकडाऊनमध्ये चारचाकी कोमात, मुंबईमध्ये सायकल जोमात; विक्रीत मोठी वाढ
त्यामुळे नागरिकानी आपल्या सृदृढतेकडे अधिक लक्ष दिले. त्यामळे नागरिकांनी सायकल खरेदीवर भर दिल्याचे सांगितले जात आहे.
Bicycle Sales Increase In Lockdown: भरभराट सुरु असलेले आणि आगोदरच मेटाकुटीला आलेले असे भल्याभल्यांचे उद्योग, व्यवसाय लॉकडाऊन (Lockdown) काळात धक्क्याला लागले. काही नवे व्यवसाय जन्माला आले. काही जुन्याच व्यवसायांनी नव्याने कात टाकली. सायकल (Bicycle) हा व्यवसयाही अशांपैकीच एक. होय, तुम्हाला जर नवी सायकल खरेदी करायची असेल तर थोडसं थांबून नियोजन करावं लागेल. कारण तुम्हाला वेटींग लिस्टमध्ये थांबावं लागू शकतं. माहिती आहे..... तुम्ही चारचाकी गाडी किंवा लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टफोन बुक करत नाही आहात. पण सायकल खरेदी करतानाही अशीच अवस्था आहे. होय, केवळ मुंबईच नव्हे तर जगभरातील अनेक देशांच्या महानगरांमध्ये अशीच अवस्था आहे. ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Bicycle Manufacturers Association ) म्हणजेच एआयसीएमए (AICMA) च्या हवाल्याने पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
एआयसीएमए चे संचालक के बी ठाकूर यांनी म्हटले आहे की, भारतात लॉकडाऊनच्या गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 41,80,945 सायकल विक्री झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सायकलविक्री आणि सायकल मागणीत इतक्या मोठ्या प्रमाणा वाढ झाली आहे. ग्राहकाला जर चांगल्या कंपनीची सायकल घ्यायची असेल तर आगोदर बुकींग करावे लागत आहे. तसेच, काही काळ वाटही पाहावी लागत आहे.
एआयसीएमएने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या पाच महिन्यांमध्ये 41,80,945 पेक्षा अधिक प्रमाणात सायकल विक्री झाली. मे महिन्यात 4,56,818, जून महिन्यात 8,51,060 तर जुलै ते सप्टेंबर या काळात 11,21,544 सायकली विकल्या गेल्या. या काळात एकूण 41,80,94 विक्री झाली. (हेही वाचा, पॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक)
लॉकडाऊन काळात नागरिकांना आपल्या आरोग्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर कळले. त्यामुळे नागरिकानी आपल्या सृदृढतेकडे अधिक लक्ष दिले. त्यामळे नागरिकांनी सायकल खरेदीवर भर दिल्याचे सांगितले जात आहे.