Horror Videos Addiction: जादूटोणा आणि भयपट पाहण्याच्या व्यसनातून तरुणाने केली आईची हत्या, भोपाळ येथील घटना

जादूटोणा आणि भयपट (Black Magic and Horror Videos) पाहण्याचे व्यसन (Horror Videos Addiction) असलेल्या एका तरुणाने चक्क आपल्या आईची हत्या केली आहे. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे ही घटना घडली. आरोपी 32 वर्षांचा युवक आहे.

Psycho Killer | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जादूटोणा आणि भयपट (Black Magic and Horror Videos) पाहण्याचे व्यसन (Horror Videos Addiction) असलेल्या एका तरुणाने चक्क आपल्या आईची हत्या केली आहे. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे ही घटना घडली. आरोपी 32 वर्षांचा युवक आहे. लोखंडी पाईप आणि क्रिकेटची बॅट टोक्यात घालून त्याने आईची हत्या केली. भोपाळ शहरातील खानूगाव परिसरात ही घटना घडल्याचे समजते. अस्मा फारुख (67) असे मृत महिलेचे नाव आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने आमच्य सहकारी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीचा त्याच्या आईशी वाद होत होता. पाठिमागील काही दिवसापासून त्याला लग्न करायचे होते. मात्र, लग्न करुन देण्यास त्याच्या आईचा नकार होता. आरोपी तरुण कोणत्याही प्रकारचा कामधंदा अथवा नोकरी करत नव्हता. त्यामुळे त्याची आई त्याला वैतागली होती. ती सतत त्याला कामधंदा करण्याबाबत बोलत होती. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करुन सातत्याने लग्नाचा तगादा लावत होता.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या आईच्या शरीरात दृष्ट आत्मा आहे. त्यामुळे ती सातत्याने त्याच्याशी दृष्टपणे वागत होती. दरम्यान, आरोपीने आपल्या भावाला आईचा मृत्यू घराच्या टेरेसवरुन पडून झाल्याचे सांगत दिशाभूल केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. (हेही वाचा, Kerala ‘Black Magic’ Case: काळ्या जादूच्या नावाखाली, पीडिताच्या शरीराचे 56 तुकडे; शरीराचे काही भाग शिजवून खाल्ले, केरळ राज्यातील धक्कादायक घटना)

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीरावर जखमा आढळल्या होत्या. डॉक्टरांनीही महिलेच्या मृतदेहावर जखमा असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरपीला संशयावरुन अटक केली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मृत अस्मा फारुख ही कोह-ए-फिजा येथील खानूगाव भागात, तिच्या दोन मुलांसह राहते. अताह-उल्ला फैझान असे तिच्या मोठ्या मुलाचे नाव आहे. तर आरोपी अब्दुल अहद फरहान हातिचा लहान मुलगा आहे.

मोठा मुलगा अताह-उल्ला मंगळवारी संध्याकाळी अशोका गार्डन परिसरातील असलेल्या पत्नीला माहेरहून नेण्यासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा फरहान आई अस्मासोबत घरातच होता. रात्री 10 च्या सुमारास अताह-उल्ला आपल्या पत्नीसह घरी परतले तेव्हा त्यांची आई अस्मा त्यांच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली. पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement