Bharat Bandh: भारत बंद संबंधित केंद्र सरकारकडून Advisory जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार

Farmers protesting against the central government | (Photo Credits: PTI)

Bharat Bandh Advisory: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून भारत बंदच्या दरम्यान मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्राने ही नियमावली सर्व राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांसाठी तयार केली असून त्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे. त्याचसोबत भारत बंद मध्ये शेतकऱ्यांनी पाठिबा द्यावा पण काही नियमांचे ही पालन करावे असे अपील केले आहे.(Bharat Bandh: शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला पुकारलेल्या 'भारत बंद' मध्ये काय सुरु, काय राहणार बंद; जाणून घ्या सविस्तर)

भारत बंदला देशातील विविध राजकीय पक्षांनी आपले समर्थन देत त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांकडून गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन केले जात आहे. त्यामुळे केंद्राने त्यांचा नवा कृषी कायदा मागे घ्यावा अशी वारंवार मागणी करत आहेत. आतापर्यंत दोन वेळा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली आहे. परंतु त्यामधून काही तोडगा अद्याप निघालेला नाही.

केंद्राने भारत बंदच्या दरम्यान मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून असे म्हटले आहे की, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भारत बंद सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना कायद्याच्या नियमांचे पालन करावे असे ही म्हटले आहे. त्याचसोबत देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्याच्या ही नियमाचे पालन करण्यात यावे असे स्पष्ट केले आहे.(Bharat Bandh: भारत बंदच्या दिवशी मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा सेवा प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणेच सुरु राहणार)

दरम्यान, भारत बंदला काँग्रेस, आम आदमी पार्टी, समजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपा आणि द्रमुक यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव हरियाणा आणि उत्तर प्रदेशालगतच्या सीमांवर अधिक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करु असे म्हटले आहे.