ममता बॅनर्जी यांचा मीम्स फोटो सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या तरुणीला 14 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार
पश्चिम बंगाल (West Bengal) येथील सहाव्या टप्प्यातील मतादापूर्वी एका तरुणीने ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा एक मीम्सच्या रुपातील फोटो सोशल मीडियात व्हायरल केला.
पश्चिम बंगाल (West Bengal) येथील सहाव्या टप्प्यातील मतादापूर्वी एका तरुणीने ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा एक मीम्सच्या रुपातील फोटो सोशल मीडियात व्हायरल केला. प्रियांका शर्मा असे या तरुणीचे नाव असून ती भाजप पक्षाची युवा मोर्चाची कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. तर प्रियांका हिला 14 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली असून उद्या सुप्रीत कोर्टात सुनावणी होणार आहे.
प्रियांका चोप्रा हिचा मेट गाला 2019 मधील लूक मधील ममता बॅनर्जी यांचा फोटो मीम्स म्हणून प्रियांका शर्मा हिने बनवला. तसेच हा फोटो सोशल मीडित पोस्ट केल्यानंतर सर्वत्र प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. मात्र राज्य सरकारने शिक्षा सुनावल्यामुळे भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तसेच याचिका सुद्धा दाखल करण्यात आली असून उद्या (13 मे) सुप्रीम कोर्टात न्या. इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.(ममता बॅनर्जी यांचा फोटो हास्यात्मक बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिलेला अटक)
तर यापूर्वी सुद्धा ममता बॅनर्जी यांचे कार्टूनमधील चित्र पोस्ट करणाऱ्या एका प्रोफेसरला शिक्षा सुनावली होती. तसेच कोर्टात त्याला 75 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. मात्र प्रियांका विरुद्ध केलेल्या कारवाईसाठी सोशल मीडियातून विरोध केला जात आहे.