Baloch Army Attack On Pakistan Army: बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 सैनिक ठार
या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे 50 सैनिक आणि गुप्तचर संस्थांचे 9 एजंट मारले गेले आहेत. याशिवाय सुमारे 51 सैनिक जखमी झाले आहेत. बलुच आर्मीने दावा केला आहे की 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत पाकिस्तानी सैन्याच्या 84 तळांवर हल्ला करण्यात आला.
Baloch Army Attack On Pakistan Army: बलुच लिबरेशन आर्मी (Baloch Liberation Army) पाकिस्तानात सतत हल्ले घडवून आणत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान आर्मी पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे 50 सैनिक आणि गुप्तचर संस्थांचे 9 एजंट मारले गेले आहेत. याशिवाय सुमारे 51 सैनिक जखमी झाले आहेत. बलुच आर्मीने दावा केला आहे की 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत पाकिस्तानी सैन्याच्या 84 तळांवर हल्ला करण्यात आला.
बलुच आर्मीने पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संस्था आणि आयएसआयच्या 9 एजंटांना ठार मारले आहे. बलुच आर्मीने या ऑपरेशनला बीएएम असे नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 72 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये बलुच आर्मीने अनेक खनिज आणि गॅस टँकरनाही लक्ष्य केले. याशिवाय, बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याचे 5 ड्रोन देखील नष्ट केले आहेत. बीएलएच्या मते, त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर सुमारे 30 हल्ले केले. (हेही वाचा - Israel PM Benjamin Netanyahu यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी केले Donald Trump यांना नॉमिनेट)
बलुच सैन्याने ही संपूर्ण कारवाई कोलवा, बेला, कच्छी आणि झालावन भागात केली आहे. बीएलएने दावा केला आहे की पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य बलुचिस्तानची संपत्ती लुटत आहेत. आम्ही हे होऊ देणार नाही. पाकिस्तानी सैन्य आता बलुचिस्तानमधील लोकांवर अत्याचार करू शकणार नाही. (नक्की वाचा: Gaza Ceasefire Deal: इस्रायलकडून 60 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावास सहमती; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. )
दरम्यान, सुहराब जिल्ह्यातील गिद्दर येथील लष्करी तळावर बीएलएने केलेल्या हल्ल्यात 18 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. एक दिवसापूर्वी बलुचिस्तानमधील झोब भागातून परतणाऱ्या 9 कामगारांचे अपहरण करून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)