Axis Bank New Policies For LGBTQIA : 'एलजीबीटीक्यू' ग्राहक, कर्मचाऱ्यांना वापरता येणार ‘एमएक्स’ पर्याय, अ‍ॅक्सिस बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

अ‍ॅक्सिस बँक ‘एलजीबीटीक्यूआयए’ पॉलीसी धोरणानुसार समलैंगिकतेला चालना देत आहे. त्यामुळे आत बँकेने मूळ लिंगापेक्षा भिन्नलिंगी असलेल्या अधवा लैंगिक अभिव्यक्ती ठेवणाऱ्या एलजीबीटीक्यू समूहातील कर्मचारी, ग्राहकांना मान्यता दिली आहे.

Axis Bank New Policies For LGBTQIA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आपल्या ‘एलजीबीटीक्यूआयए’ (LGBTQIA+) कर्मचारी आणि ग्राहकांसाठी नवी पॉलिसी (Axis Bank New Policies For LGBTQIA) घेऊन आली आहे. अ‍ॅक्सिस बँक ‘एलजीबीटीक्यूआयए’ पॉलीसी धोरणानुसार समलैंगिकतेला चालना देत आहे. त्यामुळे आत बँकेने मूळ लिंगापेक्षा भिन्नलिंगी असलेल्या अधवा लैंगिक अभिव्यक्ती ठेवणाऱ्या एलजीबीटीक्यू समूहातील (LGBTQIA Community) कर्मचारी, ग्राहकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे बँकेत कोणताही अर्ज, फॉर्म भरताना किंवा ज्या ठिकाणी लिंगाचा उल्लेख असेल त्या ठिकाणी नावापुढे श्री (मिस्टर) अथवा श्रीमती (मिसेस) संबोधनाऐवजी ‘एमएक्स’ (MX) असा पर्याय वापरता येणार आहे. बँकेने हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. हा पर्याय ऐच्छिक असेल.

सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता अपराधमुक्त ठरवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयास सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली. या निर्णयाचे औचित्य साधत अ‍ॅक्सिस बँकेने अभिन उपक्रम सुरु केला आहे. एका पत्रकाद्वारे बँकेने आपल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. बँकेने पत्रकात म्हटले आहे की, आम्ही कामाच्या ठिकाणी विविधता, समानता आणि समावेशकता हे ब्रिद घेऊन काम करतो. त्यामुळे बँकेने आता हे नवे पाऊल टाकले आहे. (हेही वाचा, Transgender Reservation: ट्रान्सजेंडर समूहाला सरकारी नोकरीत आरक्षण, कर्नाटक सरकारचे ऐतिहासिक पाऊल)

अ‍ॅक्सिस बँक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे देशभरातील इतरही बँका अ‍ॅक्सिस बँकेचे अनुकरण करतील अशी चर्चा आहे. बँकेच्या नव्या उपक्रमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांचे लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती विचारात न घेता, आरोग्य विम्याच्या (मेडिक्लेम) लाभासाठी कोणाही भागीदाराचे नाव नोंदविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अॅक्सिस बँकेत समलिंगी भागीदारासोबतही संयुक्तरित्या बचत आणि मुदत ठेव खाते उघडता येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरपासून बँकेच्या या अभिनव उपक्रमाची सुरुवात होणार आहे. .