औरंगाबाद मधील ZP शाळेत Japanese Language शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Mann Ki Baat मध्ये केले जाणार कौतुक

मन की बात मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) येथे असलेल्या एका झेडपी शाळेतील मुलांचे कौतुक केले जाणार आहे, कारण हे विद्यार्थी जपानी भाषा शिकत असल्याच्या कारणास्तव त्यांचे हे कौतुक मोदींकडून केले जाणार आहे.

Mann KI Baat | PM Narendra Modi | (Photo Credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे त्यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून देशातील जनतेसोबत संवाद साधतात. तसेच 'मन की बात' साठी लोकांच्या मनातील शंका किंवा काही सुचना असल्यास त्या सुद्धा ते पाठवण्यास सांगतात. याच शंकांचे निरसन किंवा सुचनांचा उल्लेख मोदी मन की बात मध्ये नेहमीच करताना दिसून येतात. याच पार्श्वभुमीवर आता नरेंद्र मोदी यांच्या आगामी 'मन की बात' मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) येथे असलेल्या एका झेडपी शाळेतील मुलांचे कौतुक केले जाणार आहे. कारण हे विद्यार्थी जपानी भाषा शिकत असल्याच्या कारणास्तव त्यांचे  कौतुक मोदींकडून केले जाणार आहे.(Reopening Schools In Maharashtra: महाराष्ट्रात दिवाळी नंतर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल-अजित पवार)

मन की बात या ट्विट हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्विटच्या व्हिडओत असे म्हटले आहे की, औरंगाबाद पासून 25 किमी दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जपानी भाषा शिकवली जात आहे. ही भाषा शिकवण्यासाठी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. विद्यार्थी जपानी भाषा सुद्धा उत्तमपणे बोलतात असे म्हटले आहे.

दरम्यान,  गाडवीट या गावात आतापर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मात्र, इंटरनेट सेवा येथील जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. या जिल्हा परिषद शाळेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एक परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करण्याच निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता चौथी ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपली आवडती एक भाषा निवडण्यास सांगितले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जपानी भाषेला पसंती दिली होती. त्यानंतर शाळेत जापनीज भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.