Assam Shocker: आसाममध्ये 73 वर्षीय आजोबांचा 13 वर्षांच्या नातीवर बलात्कार; गुन्हा दाखल, आरोपीला अटक
सीडब्ल्यूसीच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी कारवाई केली आणि वृद्ध आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले.
आसाम पोलिसांनी (Assam Police) बुधवारी (12 जुलै 2023) हैलाकांडी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका 73 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपीने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे, जी नात्याने त्याची नात आहे. पोलिसांनी अलीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
साधारण महिनाभरापूर्वी ही घटना घडली ती. हैलाकांडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. रिपोर्टनुसार, अलीने जून 2023 मध्ये अल्पवयीन मुलीला घरी एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर आरोपी महिनाभर फरार राहिल्यानंतर बाल कल्याण समितीने (CWC) जिल्हा प्रशासनाला या प्रकरणावर प्राधान्याने कारवाई करण्यास सांगितले. सीडब्ल्यूसीच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी कारवाई केली आणि वृद्ध आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, एका अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार व तिची हत्या करून झुबेर नावाचा आरोपी फरार आहे. आसाम पोलिसांना अद्याप त्याचा शोध घेता आलेला नाही. यावरून हिंदू संघटनांनी गोंधळ घातला आहे. हिंदू संघटनांनी 10 जुलै रोजी हैलाकांडी एसपी कार्यालयाबाहेर या प्रकरणी निदर्शने केली. 28 वर्षीय फॅक्टरी कामगार असलेल्या झुबेरने 13 वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार केला होता. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला. घटनेला 7 दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (हेही वाचा: HC on Sexual Assault Cases: बलात्कार पीडितेला तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाला जन्म देण्याची सक्ती करता येणार नाही- Allahabad High Court)
5 जुलै 2023 रोजी झुबेर अहमदने त्याच्या दोन साथीदारांसह- जबीर अहमद आणि अन्सारुद्दीन मजुमदार यांनी एका 13 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केले आणि तिला कारमध्ये एका चहाच्या बागेत नेले. तेथे मुलीवर बलात्कार केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोडून आरोपी पळून गेला. गंभीर अवस्थेत पडलेल्या मुलीची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले, तेथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी जबीर आणि अन्सारुद्दीन यांना अटक केली असली तरी जुबेर अद्याप फरार आहे.