Ashadhi Ekadashi : विठूरायाच्या महापूजेसाठी एकनाथ सज्ज, जाणून घ्या कसा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आढाषी एकादशी निमित्त पंढरपूर दौरा

त्यामुळं यावर्षी विठ्ठल रुख्मिणीची आषाढी एकादशी महापुजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपली आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या पांढूरंगाला भेटायला येतात. एकादशीच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेचा मान मिळतो. यावेळी कोणाच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण अखेर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विराजमान झालेत. त्यामुळं आता विठ्ठल रुख्मिणीची आषाढी एकादशी महापुजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

 

आषाढी एकादशी महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथेप्रमाणे सपत्निक विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा करणार आहेत. संबंधी मुख्यमंत्र्याचा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. शनिवारी म्हणजे 9 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याहून (Pune) पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने प्रस्थान करणार आहेत. रात्री 11.30 ला ते पंढरपूरात पोचतील आणि शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या कार्यक्रमाच्या समारोपास हजेरी लावणार आहेत. त्यानंतर 10 जुलै म्हणजे रविवारी मध्यरात्री 2.30 ते 4.30 या दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी शासकीय महापूजा पार पडणार आहे. पुजा आटोपल्यानंतर 5.30 वाजता मुख्यमंत्री मंदिर परीसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे (Eskon International Temple) भुमिपूजन करतील आणि नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असतील. सकाळच्या या सर्व कार्यक्रमांनंतर 11.15 वाजता 'सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास हजेरी लावतील. त्यानंतर स्वच्छता दिडींचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते 11.30 वाजता समारोप होईल. मुख्यमंत्री दुपारी 12.30 वाजता पक्ष मेळवा आटपून दुपारी 3 वाजता पंढरपूरहून सोलापूर विमान तळाच्या दिशेनं मार्गस्थ होतील आणि 4.30 वाजता मुंबईत (Mumbai) पोचतील. (हे ही वाचा :-CM Eknath Shinde : यंदा विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना!)

 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी पूजा केली होती. पण  गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात झालेला सत्ता संघर्ष पाहता यंदाच्या पूजेसाठी  उद्धव ठाकरे जाणार की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्निक यावर्षी पंढरपूरात शासकीय महापूजा करणार आहेत.