Anal Sex करण्याची चटक लागलेल्या व्यक्तीची हत्या; घटनास्थळावरुन सेक्स स्प्रे, टॅबलेट, तेल बॉटल आणि दांडके जप्त

त्याला वाटेल तेव्हा तो त्यांच्याशी संबंध ठेवायचा. पीडितांनी विरोध केला तर व्हिडिओ सर्वजनिक करण्याची धमकी देऊन पीडितांना हे संबंध ठेवण्यास प्रवृत्त करायचा. एनल सेक्स (Anal Sex) करण्याची चटक लागलेल्या मुन्नालालच्या सततच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे.

Anal Sex | Representational Image (Photo credits: Needpix)

Anal Sex Addiction: मध्य प्रदेशातील जबलपुरयेथून (Jabalpur In Madhya Pradesh) एक धक्कादाय घटना पुढे आली आहे. तीन युवकांनी मिळून 63 वर्षीय मुन्नालाल कुशवाहा नामक ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली आहे. हत्येचे कारणही धक्कादायक असल्याचे समजते. मुन्नालाल कुशवाहा या व्यक्तीस गुदामैथुन करण्याचे व्यसन (Anal Sex Addiction) होते. त्याने दबाव टाकून तीन तरुणांशी अनैसर्गिक शरीर संबंध (Unnatural Sex) ठेवले होते. त्याला वाटेल तेव्हा तो त्यांच्याशी संबंध ठेवायचा. पीडितांनी विरोध केला तर व्हिडिओ सर्वजनिक करण्याची धमकी देऊन पीडितांना हे संबंध ठेवण्यास प्रवृत्त करायचा. एनल सेक्स (Anal Sex) करण्याची चटक लागलेल्या मुन्नालालच्या सततच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन सेक्स स्प्रे (Sex Spray), सेक्स टॅबलेट (Sex Tablets), तेल बॉटल आणि दांडके जप्त केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जबलपुर येथे 9 नोव्हेंबर 2022 रोजी 63 वर्षीय मुन्नालाल कुशवाहा या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला होता. मुन्नालालची हत्या झाल्याचे स्पष्ट कळत होते. परंतू, मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना लागत नव्हता. मात्र, कायम तपासावर असलेल्या पोलिसांना 20 दिवसांनंतर मारेकऱ्याचा ठावठिकाणा लागला. जबलपुरचे ASP संजय अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुन्नालाल कुशवाहा हा तीन युवकांसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करत असे. त्याला हे पीडित तरुण जेव्हा विरोध करायचे तेव्हा तो त्यांची बदनामी करण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळलेल्या तरुणांनी त्याची हत्या केली. (हेही वाचा, Anal Sex पहिल्यांदा करत असाल तर घ्या या '5' गोष्टींची काळजी)

पोलिसांनी सांगितले की, 9 नोव्हेंबर रोजी एका शेतात आम्हाला मुन्नालाल कुशवाहा याचा मृतदेह आढळून आला. आम्ही कसून तपास केला. तेव्हा हत्येचे कारण गुदमैथून असल्याचे पुढे आले. मृत मुन्नालाल याला गुदामैथुन करण्याचे व्यसन होते. गुदमैथून करण्यासाठी तो तरुणांना सातत्याने ब्लॅकमेल करत असे. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्याची हत्या केली. आरोपींना अटक करुन पोलिसांसमोर हजर करण्यात आले. आरपींवर 10 हजार रुपयांचे इनाम होते.

पोलिसांनी सांगितले की, मृताच्या जवळपास 50 नातेवाईक, शेजारी आणि आप्तेष्ठांकडे चौकशी केल्यानंतर हत्येबाबत काही धागेदोरे हाती लागले. मुन्नालाल हा आरोपींसोबत स्वच्छेने किंवा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असे. त्यासाठी तो आरोपींना पैसे आणि दारुही देत असे. 8 नोव्हेंबर रोजी मुन्नालालने आरोपींना शेतात यायला सांगितले होते. मुन्नालाल हा शेतात येताना सेक्स स्प्रे, सेक्स टॅबलेट, तेलाची बाटली आणि लाकडी दांडकेही घेऊन आला होता.

दरम्यान, बोलावल्याप्रमाणे आरोपी शेतात आले. परंतू, त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी गुदमैथून करण्यास नकार दिला. यावर मुन्नालालने आरोपींची गावभर बदनामी करण्याची धमकी दिली. चिडलेल्या आरोपींनी त्याच शेतात मुन्नालाल याची हत्या केली. पोलिसांनी मुन्नालाल कुशवाहा याच्या मृतदेहासोबतच घटनास्थळावरुन सेक्स स्प्रे,  टॅबलेट, तेल बॉटल आणि दांडके जप्त केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif