Amitabh Bacchan COVID19 Caller Tune: कोरोना व्हायरसवरील अभिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवावी, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

देशात वाढत्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमुळे लोकांना त्याबद्दल जागृत करण्यासाठी भारत सरकाराने कॉलर ट्यूनमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील मेसेज देण्यास सुरुवात केली होती.

Amitabh bachchan (Photo Credits: Instagram)

Amitabh Bacchan COVID19 Caller Tune: देशात वाढत्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमुळे लोकांना त्याबद्दल जागृत करण्यासाठी भारत सरकाराने कॉलर ट्यूनमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील मेसेज देण्यास सुरुवात केली होती. हा संदेश लोकांना त्रस्त करत आहे. याच कारणास्तव आता दिल्लीतील हायकोर्टात त्याच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कॉलर ट्यून मधून अमिताभ बच्चन यांचा आवाज हटवावा अशी मागणी केली आहे.(COVID-19 MythBusters: काळीमिरीचा वापर करुन कोरोनावर उपचार करता येतो? जाणून घ्या विशेषज्ञांचे मत)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी कोरोना व्हायरसचे संक्रमण फार मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्यावेळीच त्यापासून बचाव करण्यासाठी कॉलर ट्यूनच्या माध्यमातून एक संदेश देण्यास सुरुवात केली होती. एखाद्याला फोन केल्यास अमिताभ बच्चन यांचा आवाजातील संदेश ऐकू येतो. त्यानंतरच फोन लागतो. मात्र जसे जसे कोरोनाचे संक्रमण कमी होऊ लागले तसे ही फोनची कॉलर ट्यून सुद्धा लोकांना नकोशी झाली आहे.याच संबंधित याचिका कोर्टात दाखल करुन ती आता बंद करावी असे म्हटले आहे. (BMC Files Complaint Against Sonu Sood: सोनू सूदच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल, रहिवाशी इमारतीचे अनधिकृत पद्धतीने हॉटेलमध्ये रुपातांतर केल्याचा ठपका)

Tweet:

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा 1 कोटींचा पार गेला आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 3 लाख 278 कोरोनाचे रुग्ण आहेत. यामधील 96.3% म्हणजेच 1 कोटी 16 हजार 859 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट होत चालली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 20 हजार 346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान, 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून 19 हजार 587 लोकांची प्रकृती सुधारली.