Alert! गिफ्टच्या नावाखाली SBI ग्राहकांची होतेय फसवणूक, चुकून सुद्धा करु नका 'हे' काम

कारण बँकेने ग्राहकांना त्यांची गिफ्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

SBI (Photo Credits: Facebook)

देशातील सर्वाधिक मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचे खाते असेल तर सावध रहा. कारण बँकेने ग्राहकांना त्यांची गिफ्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यास सांगितले आहे. कारण गिफ्टच्या नावाखाली सध्या लोकांना लुटले जात असून त्यांचे बँक खाते खाली करत आहेत. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट टाकत असे म्हटले आहे की, एसबीआयने स्कॅम बद्दल काही डिटेल्स शेअर केले आहेत. तर जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती.(7th Pay Commission: सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी; वेतनात वाढ होण्याची शक्यता)

SBI चा एक फोटो ग्राहकांनी शेअर केला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, त्याला एक फ्री गिफ्टचा मेसेज आला आहे. हे खरंच आहे की खोटे आहे. यावर ट्विटरने उत्तर देत असे म्हटले की, तुम्हाला आलेला गिफ्टचा हा मेसेज खोटा आहे. अशातच तुम्ही सतर्क रहा. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करुन फसवणूक करणारे लोक लोकांना भुलवून आपल्या बोलण्यात फसवतात. हे फसवणूक एखादी लॉटरी किंवा गिफ्ट जिंकल्याबद्दल सांगितले जाते. त्यानंतर ग्राहकांना एका खोट्या एसबीआय क्रमांकावर फोन करण्यास सांगितले जाते.(Aadhaar Online Services: आता mAadhaar App होणार अधिक सुरक्षित; 4 अंकी पासकोड सेट करण्याची मिळणार मुभा; इथे पहा अधिक माहिती)

Tweet:

सायबर क्रिमिनल्स ग्राहकांना असे म्हणतात की, अवॉर्डचे पैसे मिळवण्यासाठी डिटेल्स शेअर करणे अनिवार्य आहे. या डिटेल्सच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. SBI ने स्पष्टपणे ग्राहकांना सांगितले की, कंपनीची कोणतीही लॉटरी स्किम किंवा लकी ड्रॉ सुरु नाही आहे. ऐवढेच नाही तर बँक कोणत्याही प्रकारचे गिफ्ट देत नाही आहे. एसबीआयने आधीच सुचना दिली आहे की, हे क्रिमिनल्स ग्राहकांना फसवण्यासाठी आणि पैसे लुटण्यासाटी अशा पद्धतीचे काम करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फेक कॉल किंवा फॉरवर्डेड मेसेजव भरोसा करु नका. ग्राहकांनी नेहमीच लक्षात ठेवावे की, आपली खासगी माहिती जसे बँक डिटेल्स/एसएमएस/कॉल/व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून विचारली जात नाही.