Ambani कुटुंबामध्ये आला नवा चिमुकला; Akash Ambani-Shloka Mehta यांना पुत्रप्राप्ती
आकाश आणि श्लोका मागील वर्षी मार्च महिन्यात विवाहबंधनात अडकले होते. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता.
Reliance Industries Chairman मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी नव्या चिमुकल्याचं आगमन झालं आहे. मुकेश अंबानी यांचा लेक आकाश (Akash Ambani) आणि सून श्लोका (Shloka Mehta) यांना मुलगा (Baby Boy) झाला आहे. दरम्यान अंबानी कुटुंबाच्या प्रवक्तांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नीता आणि मुकेश अंबानी आजी आजोबा तर आकाश आणि श्लोका आई वडील झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
अंबानी कुटुंबाने देखील श्लोका आणि नवजात बालक दोघेही सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. कृष्ण भगवानच्या कृपाने आमच्याकडे नवा पाहुणा आला आहे. श्लोका आणि आकाश अंबानी पालक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती, टोपण नाव ते निवासस्थान Antilia Building बाबत इंटरेस्टींग गोष्टी!
आकाश अंबानी हे मुकेश आणि नीता अंबानी यांचा थोरला मुलगा आहे. श्लोका मेहता ही हिरे व्यापारी रसेल मेहता आणि मोना यांची लेक आहे. आकाश आणि श्लोका मागील वर्षी मार्च महिन्यात विवाहबंधनात अडकले होते. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याला भारताप्रमाणेच देशा-परदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सिने जगतापासून क्रिकेटर्स, व्यापारी ते अगदी राजकीय मंडळी उपस्थित होती.
मुकेश आणि नीता अंबानी यांना 3 मुलं आहेत. आकाश आणि इशा (29 वर्ष) ही दोन जुळी तर अनंत अंबानी ( (25 वर्ष) हा सर्वात धाकटा मुलगा आहे. मागील महिन्यात दिवाळी पूर्वीच अंबानी कुटुंब परदेशातून मुंबईमध्ये परतले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2020 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

