ATF Price Hike: विमानांची तिकिटे महागणार! तेल कंपन्यांनी 1.45 टक्क्यांनी वाढवल्या विमान इंधनाच्या किमती
तेल कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एटीएफच्या किमतीत 13,181.2 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केली आहे. यामुळे, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (Aviation Turbine Fuel) किंमत 91,856.84 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.
ATF Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी विमान कंपन्यांना (Airlines) मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजे 1 डिसेंबरपासून एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे विमान कंपन्याच्या तिकिटावरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे. तेल कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एटीएफच्या किमतीत 13,181.2 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केली आहे. यामुळे, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (Aviation Turbine Fuel) किंमत 91,856.84 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. याशिवाय, ATF कोलकातामध्ये 94,551.63 ₹ प्रति किलोलिटर, मुंबईमध्ये 85,861.02 ₹ प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये 95,231.49 ₹ प्रति किलोलीटर दराने उपलब्ध आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यातही एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. गेल्या महिन्यात देखील, एटीएफची किंमत प्रति किलोलिटर 2,941.5 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे विमान कंपन्यांचा परिचालन खर्च झपाट्याने वाढत आहे. एटीएफ महाग झाल्यामुळे विमान कंपन्याच्या तिकिटांची किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढवू शकतात. (हेही वाचा - ST Fare Price To Hike: 'लालपरी'चा प्रवास महागणार! एसटी महामंडळाने सरकारसमोर मांडला 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव)
परिणामी, प्रवाशांना विमान प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने एटीएफच्या किमती वाढत आहेत. एअरलाईन्सच्या एकूण खर्चापैकी 40 टक्के हवाई इंधनाचा खर्च येतो. सरकारी मालकीचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) बेंचमार्क असलेल्या आंतरराष्ट्रीय इंधनाच्या सरासरी किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट होतात. (हेही वाचा - Highest Office Rent In India: दिल्ली-मुंबई, ना बेंगळुरू-गुरुग्राम, वाढत्या भाड्याच्या बाबतीत ही शहरे आहेत आघाडीवर)
पेट्रोल आणि डिझेलचे दर -
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 94.77 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. याशिवाय पटनामध्ये पेट्रोल 105.58 रुपये प्रति लिटर आणि चंदीगडमध्ये 94.30 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेलबद्दल बोलायचे झाले तर ते दिल्लीत 87.67 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय पाटणामध्ये डिझेल 92.42 रुपये प्रति लीटर आणि चंदीगडमध्ये 82.45 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)