London-Bound Air India Flight Cancelled: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 159 विमानातही तांत्रिक बिघाड; उड्डाण रद्द
एअर इंडियाच्या एआय 159 विमानात तांत्रिक बिघाड (Technical Failure) आढळून आला. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या एआय 159 हे विमान आज अपघातग्रस्त विमान एआय 171 ऐवजी अहमदाबादहून लंडनला जाणार होते.
London-Bound Air India Flight Cancelled: गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मंगळवारी रद्द (Air India Flight Cancelled) करण्यात आले. एअर इंडियाच्या एआय 159 विमानात तांत्रिक बिघाड (Technical Failure) आढळून आला. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या एआय 159 हे विमान आज अपघातग्रस्त विमान एआय 171 ऐवजी अहमदाबादहून लंडनला जाणार होते.
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एआय171 विमानाच्या अपघातात 241जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले होते. त्यानंतर हे विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. (ेहही वाचा - Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी)
हाँगकाँग-दिल्ली विमानात तांत्रिक समस्या
दरम्यान, सोमवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पायलटला तांत्रिक बिघाडाचा संशय आल्याने हे विमान मूळ विमानतळावर परत पाठवण्यात आले. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. (हेही वाचा - IndiGo Flight Emergency Landing In Nagpur: बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर कोची-दिल्ली इंडिगो विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग)
सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमानात तांत्रिक समस्या
याशिवाय, एअर इंडियाने त्यांच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोलकाता येथे नियोजित थांब्यावर सॅन फ्रान्सिस्को-मुंबई उड्डाण रद्द केले. उड्डाण रद्द झाल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडाला आणि 'बोईंग 777-200 एलआर' मधील 211 प्रवाशांनी अधिकाऱ्यांकडे विनंती केली की, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवावे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)