IndiGo Flight Emergency Landing In Nagpur: बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर कोची-दिल्ली इंडिगो विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग
इंडिगोचे विमान 6E 2706 सकाळी 9.20 वाजता केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला निघाले होते. परंतु, हवेतच त्याला बॉम्बची धमकी मिळाल्याने ते नागपूर विमानतळावर वळवण्यात आले.
IndiGo Flight Emergency Landing In Nagpur: मंगळवारी कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला (Kochi-Delhi IndiGo flight) बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाल्याने या विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. इंडिगोचे विमान 6E 2706 सकाळी 9.20 वाजता केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला निघाले होते. परंतु, हवेतच त्याला बॉम्बची धमकी मिळाल्याने ते नागपूर विमानतळावर वळवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या विमानात 157 प्रवासी होते.
सुरुवातीच्या अहवालांनुसार, विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती एअरलाइन अधिकाऱ्यांना मिळाली होती. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, विमानाचे वळण बदलून नागपूरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) तात्काळ विमानतळावर पोहोचले. त्यांनी विमानाची कसून तपासणी सुरू केली. (हेही वाचा -Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी)
सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमान तपासणीसाठी वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि स्थानिक पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. (हेही वाचा -Technical Fault in Saudia Airlines Flight: सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; लखनऊ विमानतळावर लँडिंग दरम्यान चाकातून निघाल्या ठिणग्या)
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
यापूर्वी, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे प्रवाशांना पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे विमानातून खाली उतरवण्यात आले. सोमवारी संध्याकाळी, दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे आणखी एका विमानात संशयास्पद तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर उड्डाणानंतर सुमारे 90 मिनिटांनी हाँगकाँगला परतले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

