Sabarimala Temple: शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशानंतर भाजपकडून सडकून टीका
महिलांच्या या कृत्यावर भाजपने सडकून टीका केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वाद रंगला होता. अखेर आज सकाळी शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करुन देव दर्शन घेतले. महिलांच्या या कृत्यावर भाजपने सडकून टीका केली आहे.
ही घटना खरी असेल तर अत्यंत विनाशकारी असल्याचे ट्विट भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी केले आहे.
तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी (Smirti Irani) यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. प्रार्थना करण्याचा अधिकार असला तरी पवित्र स्थळाचा अपमान करायचा अधिकार आपल्याला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. "मी हिंदू असून माझा पती पारशी आहे आणि पारशांच्या अग्यारीत प्रवेश करण्यास मला बंदी आहे," असे म्हणत त्यांनी शबरीमला मंदिरातील महिला प्रवेश बंदीला यापूर्वी सर्मथन दर्शवले होते. केरळ: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नाही
बिंदु (Bindu) आणि कनकदुर्गा (Kanakdurga) या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करुन शेकडो वर्षांची परंपरा मोडली. या महिलांच्या प्रवेशानंतर मंदिर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी मान्यता दिली असली तरी न्यायालयाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अद्याप महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.