Kolkata Gang Rape: कोलकात्यातील आरजी कर प्रकरणानंतर आता लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; 3 आरोपींना अटक

शहरातील लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाला. या घटनेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Kolkata Gang Rape: कोलकात्यातील आरजी कर प्रकरणानंतर आता लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; 3 आरोपींना अटक
Rape Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Kolkata Gang Rape: गेल्या वर्षी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा बलात्कार करून तिची हत्या (RG Kar Rape And Murder Case) करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला. आता पुन्हा एकदा कोलकात्यातील आणखी एका शैक्षणिक संस्थेतून क्रूरतेचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाला. या घटनेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि त्याच संस्थेतील दोन कर्मचारी आहेत. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 25 जून, बुधवार रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.50 दरम्यान तिच्यावर बलात्कार झाला. आरोपींना गुरुवारी, 26 जून रोजी अटक करण्यात आली. या घटनेबाबत, भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, '25 जून रोजी कोलकात्याच्या उपनगर कसबा येथील एका लॉ कॉलेजमध्ये एका कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एका माजी विद्यार्थी आणि दोन कॉलेज कर्मचाऱ्यांनीच तरुणीवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचाही त्यात सहभाग असल्याचे वृत्त आहे. आरजी करची दहशत अजूनही कमी झालेली नाही, तरीही असे गुन्हे दररोज वाढत आहेत.' (हेही वाचा - Goa Murder Case: 22 वर्षीय प्रियकराने गर्लफ्रेंडला गोवा मध्ये लग्न करण्याच्या बहाण्याने आणून केला खून)

भाजप नेते अमित मालवीय यांची एक्स पोस्ट - 

आरोपींना अटक

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि 26 जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत आणि तिन्हींना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबियांनाही बोलावून घटनेबद्दल चौकशी केली आहे. तथापि, कुटुंबाच्या चौकशीदरम्यान घटनेबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आली नाही. (नक्की वाचा: Haryanvi Model Sheetal Murder: हरियाणवी मॉडेल शीतलची हत्या; कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह .)

वर्गातचं करण्यात आला बलात्कार -

पीडितेने पोलिसांना सांगितले की आरोपीने तिला महाविद्यालयाच्या खोलीत बोलावले, जिथे सामूहिक बलात्काराची घटना घडली. आरोपींपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला आणि बाकीच्यांनी मुख्य आरोपीला मदत केली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2025 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).