Goa Murder Case: 22 वर्षीय प्रियकराने गर्लफ्रेंडला गोवा मध्ये लग्न करण्याच्या बहाण्याने आणून केला खून

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) टिकम सिंग वर्मा म्हणाले की, पीडित आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. रोशनीच्या हत्येमागे काही वैयक्तिक नातेसंबंधांतील तणावाचे कारण असल्याचे दिसून येते. केविनला संशय होता की रोशिनी त्याची फसवणूक करत आहे.

Goa Murder Case: 22 वर्षीय प्रियकराने गर्लफ्रेंडला गोवा मध्ये लग्न करण्याच्या बहाण्याने आणून केला खून
Murder प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

गोवा (Goa) मध्ये लग्नाचं आमिष दाखवून नेलेल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरूण 22 वर्षीय असून तो बेंगलूरू चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणी देखील 22 वर्षांची होती. तिचा मृतदेह Mollem Wildlife Sanctuary पासून सुमारे 100 मीटर दूर अंतरावर सापडला आहे.

HT च्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव Sanjay Kevin M असे आहे. हा तरूण उत्तर बेंगळुरूचा रहिवासी आहे. Roshni Moses M, ही 22 वर्षीय मृत तरूणी आहे. रोशनी देखील त्याच परिसरातील होती. ती कर्नाटकातील एका शाळेत काम करत होती, तर केविन बेरोजगार होता.

रोशनी आणि संजय हे लग्न करण्यासाठी बेंगळुरूहून गोव्यात आले होते. पण काही अज्ञात कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि दोन दिवसांपूर्वी संजयने रोशनीची हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रोशनीच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या गळ्यावर खोलवर जखमा झाल्या असण्याची शक्यता आहे, जी कदाचित एखाद्या धारदार शस्त्राने झाली असेल. अंकुरित काजू शोधत असलेल्या एका स्थानिक शेतकऱ्याला सोमवारी सकाळी मृतदेह दिसला आणि त्याने ताबडतोब पोलिसांना कळवले. नक्की वाचा: Haryanvi Model Sheetal Murder: हरियाणवी मॉडेल शीतलची हत्या; कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह .

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) टिकम सिंग वर्मा म्हणाले की, पीडित आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. रोशनीच्या हत्येमागे काही वैयक्तिक नातेसंबंधांतील तणावाचे कारण असल्याचे दिसून येते. केविनला संशय होता की रोशिनी त्याची फसवणूक करत आहे.

दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे जोडपे बेंगळुरूहून गोव्याला सरकारी कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसने प्रवास करत होते. गोव्यात एका दिवसाच्या सुट्टीसाठी आले होते. ते एका दुर्गम ठिकाणी बसमधून उतरले. नंतर महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सुमारे 100 मीटर अंतरावर जंगली भागात आढळला.

महिलेच्या सामानात सापडलेल्या बसच्या तिकिटावरून या प्रकरणाचा तपास करणार्‍यांना ही पहिली माहिती मिळाली, ज्यामुळे ते आरोपीने बुक केले असल्याचे समोर आले आहे. एसपी टिकम सिंग वर्मा म्हणाले की, केविनला मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथून अटक करण्यात आली आणि चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).