Adani On Hindenburg Allegations: अदानींकडून हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल मधील आरोपांचे खंडन, भारतावरील हा 'Calculated Attack' चा डाव असल्याचा दावा
Adani Group. (Photo Credit: ANI)

भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमधील एक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर Hindenburg Research कडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर देशात आणि शेअर बाजारात मोठी खळबळ माजली आहे. मात्र रविवारी यावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी ग्रुप कडून हे सारे आरोप खोटे असल्याचं सांगताना Hindenburg Research हा भारतावरील “calculated attack” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याच्या माध्यमातून देशाच्या 'विकासा'वर हल्ला करण्याचा त्यांचा मानस आहे असंही म्हटलं आहे. त्यामुळे हे सारे आरोप खोटे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

413 पानी प्रतिक्रिया देताना अदानी ग्रुप कडून Hindenburg Research चा रिपोर्ट हा अमेरिकन फर्मचा गुप्त हेतू होता ज्याद्वारा त्यांना खोटा बाजार मांडून फायदा मिळवायचा आहे. "हा केवळ एका कंपनीवर केलेला खोटा हल्ला नाही तर भारतावर, भारतीय संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता आणि भारताच्या विकासाला आणि महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावणारा हल्ला आहे," असे त्यात म्हटले आहे. नक्की वाचा: Adani Group And Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाचा अदानी साम्राज्याला धक्का; कायदेशीर कारवाईची शक्यता, शेअर बाजारातही खळबळ .

पहा ट्वीट

हिंडेनबर्ग रिसर्च ही 2017 साली स्थापना करण्यात आलेली अमेरिका स्थित कंपनी आहे. असून नॅथन अँडरसन या रिसर्च एजेन्सीचे संस्थापक आहेत. हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्च ही विविध कंपनीत होणार्‍या घोटाळ्यांचे शोध घेते. नंतर त्यांचे अहवाल प्रकाशित करते. या फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्थेद्वारा इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण केले जाते. 'अदानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअरचं मूल्य कृत्रिमरित्या फुगवण्यात आलं आहे.' असा आरोप हिंडेनबर्गचा अहवालात आहे. या अहवालानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली. एका दिवसांत गौतम अदानी यांच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील स्थान देखील घसरले.

 

आता अदानी समुहाकडून  हिंडेनबर्ग रिसर्च चा अहवाल फेटाळत त्याविरूद्ध कोर्टात जाण्याची देखील तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 'अदानी समूह कायदेशीर कारवाईच्या बाबतीत खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी अमेरिकेतही आमच्या विरोधात खटला दाखल करावा. आम्ही आवश्यक कागदपत्रांची यादी तयार केली आहे. कायदेशीर प्रक्रियेदरम्यान ती सादर करण्याची मागणी कंपनीकडं करू', असं हिंडनबर्ग कडून सांगण्यात आले आहे.