Illegal Loan Apps: अवैधरित्या कर्जपुरवठा करणाऱ्या ऍप्सवर होणार कारवाई; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नियमित बँकिंग व्यवस्थेबाहेरील "अवैध कर्ज पुरवठा करणाऱ्या ऍप्स" शी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नियमित बँकिंग व्यवस्थेबाहेरील "अवैध कर्ज पुरवठा करणाऱ्या ऍप्स" शी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अर्थ मंत्रालयाचे वित्त सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव ; महसूल आणि कंपनी व्यवहार (अतिरिक्त प्रभार)सचिव; वित्तीय सेवा विभागाचे सचिव; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव; रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते.

कर्जपुरवठा करणाऱ्या अवैध ऍप्सच्या वाढत्या घटनांबद्दल विशेषत: वंचित आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना चढ्या व्याजदराने कर्ज देणे, प्रक्रिया/छुपे शुल्क, तसेच धमकावून केली जात असलेली वसुली याबाबत अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. अशा अवैध कृत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनी लाँड्रिंग, कर चुकवेगिरी, गोपनीय माहिती उघड करणे आणि अनियंत्रित अवैध व्यवहार, बनावट कंपन्या, अस्तित्वात नसलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था इत्यादींचा गैरवापर होण्याची शक्यता देखील सीतारामन यांनी लक्षात घेतली.

बैठकीत झालेली चर्चा खालील प्रमाणे: