Aadhar सोबत IRCTC अकाउंट करा लिंक, एका महिन्यात बुक करता येतील 12 तिकिट बुकिंग
मात्र आयआरसीटीसीच्या नियमानुसार एका युजर आयडीच्या माध्यमातून एकाच महिन्यात फक्त 6 तिकिटे बुकिंग करण्याची परवानगी आहे.
रेल्वेचे तिकिट बुकिंग करण्यासाठी सध्या बहुतांश लोक हे ऑनलाईन पद्धतीचा वापर करतात. मात्र आयआरसीटीसीच्या नियमानुसार एका युजर आयडीच्या माध्यमातून एकाच महिन्यात फक्त 6 तिकिटे बुकिंग करण्याची परवानगी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की, एक सामान्य युजर्सला सुद्धा 12 तिकिटे बुक करण्याची परवानगी ही देऊ केली आहे. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे आयआरसीटीसीच्या अकाउंट सोबत वेरिफाय करावे लागणार आहे. या व्यतिरिक्त कमीत कमी एक पेसेंजरला आधार कार्डच्या माध्यमातून वेरिफाय करावे लागते.(Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 1664 रिक्त पदांवर नोकर भरती, 8 वी पास उमेदवारांना करता येईल अर्ज)
आधीसारखेच जर तुम्ही महिन्यात 6 तिकिट बुक करत असाल तर वेरिफिकेशन करण्याची गरज नाही. आयआरसीटीसी रजिस्टर्ड युजर्सला My Profile कॅप्शनमध्ये जाऊन Aadhar KYC ऑप्शनच्या माध्यमातून स्वत: वेरिफिकेशन करण्याची गरज आहे.युजरच्या आधारला वेरिफाय करण्यासाठी त्याच आधार कार्डसह रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाणार आहे. योग्य ओटीपी टाकल्यानंतर आधार कार्डचे वेरिफिकेशन होणार आहे.(देशातील रस्ते हे अमेरिकेसारखे पुढील 3 वर्षात दिसतील- नितीन गडकरी)
या व्यतिरिक्त महिन्यात 6 पेक्षा अधिक तिकिट बुक केल्यास कमीत कमी एका पेसेंजरला सुद्धा आधार वेरिफाय करावे लागणार आहे. युजर्सला संभावित प्रवाशांच्या आधार क्रमांकासह वेरिफाय करण्याची गरज असते. त्यांना मास्टर लिस्टमध्ये अॅड करावे लागते. लक्षात असू द्या की, तुम्ही एका महिन्यात 6 पेक्षा अधिक तिकिट बुक करणार असाल तर ही प्रक्रिया पूर्ण करा. युजर्सला तिकिट बुक करताना आधार वेरिफाइड पेसेंजर्सला थेट मास्टर लिस्ट मध्ये अॅड करु शकतात.