Aadhar Card वरील डिजिटल पद्धतीची सही पडताळून पहाण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
आधार कार्ड (Aadhar Card) हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बँक खाते सुरु करण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंतच्या कामासाठी आधार कार्डची गरज भासते. त्याचसोबत अन्य काही महत्वाची कामे करण्यासाठी ही आधार कार्डची विचारणा केली जाते. UIDAI आधार कार्ड ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला याची डिजिटल कॉपी ठेवण्याची परवानगी आहे. आधार कार्डची डिजिटल कॉपी ही हार्ड कॉपी प्रमाणेच मान्य असते.(Aadhaar PVC Card घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर कसं कराल? जाणून घ्या त्याचे फायदे)
UIDAI च्या वेबसाईट वरुन आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पासवर्डसह आपली फाइल सुरु करु शकता. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर सही आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी वॅलिडिटी स्पेस पहावा लागणार आहे. जर त्यावर '?' असे साइन असेल तर तुम्हाला डिजिटल आधार कार्डवर मॅन्युअल पद्धतीने ते वॅलिड करावे लागणार आहे.(Aadhaar Card ला लिंक केलेला मोबाईल नंबर नेमका कोणता? हे जाणून घेण्यासाठी uidai.gov.in वर फॉलो करा या स्टेप्स!)
>>आधार कार्डवर डिजिटल पद्धतीने सही कशी कराल?
- पासवर्डच्या मदतीने आधार कार्डची पीडीएफ सुरु करा.
-पीडीएफ सुरु झाल्यानंतर Validity Unknown या ऑप्शन शोधा.
- या ऑप्शनवर Right Click करुन Validate Signature वर क्लिक करा.
-त्यानंतर एक नवी विंडो सुरु होईल. येथे Signature Properties वर क्लिक करा.
- आता Show Certificate वर क्लिक करा.
-येथे तुम्हाला "NIC sub-CA for NIC 2011, National Informatics center" हा ऑप्शन आहे की नाही तपासून पहावा लागणारर आहे. यावर मार्क केल्यानंतर Trust बटणावर क्लिक करुन Add to Trusted Identities ऑप्शन निवडा.
-त्यानंतर सिक्युरिटी प्रश्नाच्या विंडोवर Ok रिप्लाय करा.
- आता 'युज द सर्टिफिकेट्स एज ए ट्रस्टेड रुट फिल्डवर टिक केल्यानंतर OK वर दोन वेळा क्लिक करा.
-त्यानंतर वॅलिडेशन पूर्ण करण्यासाठी Validate Signature वर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्हाला डिजिटल पद्धतीने सही पडताळून पाहता येणार आहे. तसेच आधार कार्ड संबंधित अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला जरुर भेट द्या.