सेव्हन हिल्स रुग्णालयात 60 वर्षांच्या COVID 19 रुग्णाच्या आत्महत्येप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा रिपोर्ट दाखल ; 9 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या, कोरोना अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला भेट द्या.

10 May, 05:25 (IST)

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 60 वर्षांच्या COVID 19 रूग्णाने आत्महत्या केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला गेला असून तपास सुरू आहे.

10 May, 05:16 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुवेत मध्ये अडकलेल्या 163 भारतीयांना एअर इंडियाच्या विमानाने हैदराबाद येथे परत आणण्यात आले आहे.

10 May, 04:47 (IST)

सायन रुग्णालयाच्या नंतर आता बीएमसीच्या केईएम हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोरोना वॉर्डमध्ये उपचारासाठी असणाऱ्या रूग्णांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह डेड बॉडीज ठेवलेल्या आढळत आहेत असा दावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी ट्विटरवरून केला आहे. याच ट्विट मध्ये सोमैया यांनी ठाकरे सरकार असे अमानुष वर्तन कधी थांबवणार आहेत असाही सवाल केला आहे.

10 May, 04:31 (IST)

जम्मू मधील सांबा जिल्ह्यातील गोरण वनक्षेत्रात पोलिसांनी 3 ग्रेनेड आणि 54 Live Rounds जप्त केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

10 May, 04:01 (IST)

तेलगंणामध्ये आज 31 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 1163 वर पोहोचली आहे.

 

10 May, 03:31 (IST)

पुणे शहरात आज 1 हजार 543 व्यक्तींच्या कोरोना चाचणी झाल्या असून एकूण संख्या 21 हजार 813 झाली आहे. यापैकी आजवर 2 हजार 380 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, तर 826 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 1414 रुग्णांवर उपचार सुरु असून 140 रुग्ण दगावले आहेत. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

10 May, 03:07 (IST)

NIA ने आज पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांच्या पथकांसह हरियाणाच्या सिरसा येथे एक दहशतवादी रणजित सिंग याला अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाझ नाईकू याच्याशी सिंग यांचे संबंध आहेत.

10 May, 02:53 (IST)

अहमदाबाद मध्ये 280 नवीन कोविड19 प्रकरणे आणि 20 मृत्यूची नोंद झाली असून एकूण प्रकरणांची संख्या 5  हजार 540 वर पोहचली आहे तर एकूण 363 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

10 May, 02:45 (IST)

आज, शनिवार 9 मे रोजी संध्याकाळी  'श्रमिक स्पेशल' ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  1200 प्रवाशांसह उत्तर प्रदेशातील गोंडासाठी रवाना झाली आहे.

10 May, 02:11 (IST)

महाराष्ट्रात आज 1165 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20,228 वर पोहचला आहे. 

10 May, 01:54 (IST)

मुंबई येथून धनबाद येथे परतलेल्या आणखी 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

10 May, 01:37 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात 394 आणखी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

10 May, 01:00 (IST)

तमिळनाडू येथे आणखी 526 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 6535 वर पोहचला आहे.

10 May, 24:50 (IST)

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

10 May, 24:12 (IST)

पंजाब येथे कोरोनाबाधितांचा आकडा 1762 वर पोहचला आहे.

09 May, 23:58 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने नवे आयुक्त इक्बाल चहल यांनी धारावी परिसराला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

09 May, 23:39 (IST)

धारावीत आज 25 आणखी कोरोनाबाधित रुग्ण तर एकाचा मृत्यू झाला आहे.

09 May, 23:18 (IST)

कर्नाटक येथे आणखी 41 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 794 वर पोहचला आहे.

09 May, 23:09 (IST)

देशातील जवळजवळ 3 हजार CBSE शाळांची मुल्यांकन केंद्र म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी दिली आहे.

Read more


काल (8 मे) औरंगाबाद येथे झालेल्या 16 मजूरांचा अपघाती मृत्यूने सर्वांचे हृदय पिळवटून टाकले. दरम्यान काल रात्री त्यांचे मृतदेह श्रमिक ट्रेन मार्फत मध्य प्रदेशला पाठवण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. अशी माहिती औरंगाबाद ग्रामीण च्या एसपी मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.

भारतभर कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी अवघ्या काही दिवसांनंतर संपेल. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्याने राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान कोरोना व्हायरसचा कहर अमेरिकेत सर्वाधिक पाहायला मिळत आहे. तेथील कोरोना बाधितांची तसंच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. पेन्सचे प्रेस सेक्रेटरी Katie Miller यांची देखील कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले व्हाईट हाऊसमधील हे दुसरे सदस्य आहेत. अशी माहिती AFP वृत्तसंस्थेने दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now