Bombay High Court on ED: एकनाथ खडसे यांना अटक कशाला करायला हवी? ; 8 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

09 Mar, 05:00 (IST)

मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयावर सोमवारी (8 मार्च) प्रश्नांची सरबत्ती केली. एकनाथ खडसे जर चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहेत तर मग त्यांना अटक कशासाठी करायला हवी? असा सवाल न्यायालयाने ईडीला विचारला. एकनाथ खडसे यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विरोधात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली. या वेळी न्यायालयाने ईडीला हा सवाल विचारला.

09 Mar, 04:40 (IST)

ड्रेनेज बांधताना भींत कोसळून सहा मजूर ठार झाले. बिहारच्या खागारिया चंडी टोला येथे ही घटना घडली आहे. भिंतीखाली आणखीही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सरु आहे.

09 Mar, 04:21 (IST)

अहवालानुसार आज रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 2,26,85,598 लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरातील कोरोना विषाणू लसीकरणाच्या आजच्या 52 व्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 16,96,588 लस डोस देण्यात आल. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती सांगितली आहे.

09 Mar, 03:41 (IST)

महाराष्ट्र: गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गावर मालगाडीच्या धडकेत गोंदियामध्ये एका वाघाचा मृत्यू  झाला.

09 Mar, 02:50 (IST)

Madhya Pradesh: बालाघाट जिल्ह्यात गोळीबार झाल्यावर मध्य प्रदेश पोलिसांच्या हॉक फोर्सने नक्षलवाद्याला अटक केली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केलेले 14 लाख रुपयांचे बक्षीस या नक्षलवाद्यावर होते.

09 Mar, 02:31 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8744 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले आहे. तर, 9068 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीचा तपशील खालीलप्रमाणे

Total cases 22,28,471
Total recoveries 20,77,112
Death toll 52,500

Active cases 97,637

09 Mar, 01:58 (IST)

कर्नाटकमध्ये महिलांना कोरोना लसिकरणासाठी Pink Vaccination Booth उभारण्यात आले आहेत. International Womens Day निमित्त तिथल्या सरकारने हा उपक्रम राबवला.

09 Mar, 01:41 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘मैत्री सेतु’ (‘Maitri Setu’ ) चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यान ते त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यासही करणार आहेत.

09 Mar, 01:26 (IST)

मुंबई शहरात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 956 जणांना डिस्चार्ज मिळाला. संपूर्ण दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 इतकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

09 Mar, 01:15 (IST)

इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी लोकसभा सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर लोकसभा सभागृह एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले.

09 Mar, 24:59 (IST)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वाराणसीत महिला-मुलींकडून 'शिव तांडव स्तोत्रम' चे पठण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील एका संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

09 Mar, 24:19 (IST)

भरती परीक्षा पेपर घोटाळा प्रकरणात लष्कराच्या अधिकाऱ्यास 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

09 Mar, 24:16 (IST)

अमृता फडणवीस यांचे आणखी एक गाणे अखेर प्रदर्शीत झाले आहे. युट्यूब आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे गाने पाहायला मिळते. हे गाणे आपण इथे पाहू शकता.

08 Mar, 23:31 (IST)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोविड 19 लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे. त्यावरुन टोला लगावत बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, ही कोविड लस नव्हे तर ती मोदी लस आहे. शाळा, महाविद्यालयं, स्टेडीयम्स यांना मोदींची नावं दिली जात आहे. हा काळाचा महिमा आहे. कुणी सांगावं भविष्यात भारताचेही नाव बदलले जाईल असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

08 Mar, 23:10 (IST)

मनसुख हिरेन प्रकरणाची एटीएस (ATS) चौकशी करत आहे. व्यवस्था केवळ एका व्यक्तीसाठी नसते. ती सर्वांसाठी काम करते. यावर आमचा विशवास आहे म्हणूनच हा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. असे असले तरी केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे. याचाच अर्थ असा आहे की, यात काहीतरी हेतू आहे. हा हेतू उघडकीस आणेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

08 Mar, 23:05 (IST)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आयपीएल सामन्यांवरुन म्हटले आहे की, आपण बीसीसाआयला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण म्हटले आहे की, जर मुंबईत सामना खेळला जाऊ शकतो, जिथे दररोज 9,000 केसेस मिळातात. तर मोहाली का नको? आम्ही आवश्यक ती काळजी घेऊ.

08 Mar, 22:41 (IST)

West Bengal Elections 2021 च्या पार्श्वभूमीवर Sital Kumar Sardar सह 5 TMC MLA चा भाजपा मध्ये पक्षप्रवेश  केला आहे. यामध्ये 2 टीएमसीचे विद्यमान आमदार देखील आहेत.

08 Mar, 21:50 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 239 रुग्ण आढळले असून 3 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे.

08 Mar, 21:37 (IST)

सैन्य दलातील भरतीसाठीचे पेपर लीक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एका मेजरला अटक करण्यात आली आहे.

08 Mar, 20:44 (IST)

तामिळनाडूचे मंत्री  Sellur K Raju यांनी घेतली कोविड 19 ची लस  घेतली आहे. सध्या देशभर  कोविड 19 लसीकरणाला सुरूवात केली आहे.

Read more


आज (8 मार्च) पासून दिल्लीत संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आज महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कार्यकाळातील दुसरं बजेट विधिमंडळात सादर करेल. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज हा अर्थसंकल्प मांडतील. सामान्यांना या अर्थसंकल्पामध्ये कोविड 19 लसीकरण, शेती ते इंधना दर यांच्याबद्दल काय घोषणा होणार? याकडे जनसामान्यांचे लक्ष असेल.

दरम्यान आज 8 मार्च आहे. हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत जगभरातील महिला शक्तीला सलाम केला जातो. जगाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं असलेलं अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करण्याचा आजचा दिवस आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अनेक मातब्बर राजकारण्यांनी सुद्धा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस खास केला आहे. भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या स्थळी महिला दिनाचं औचित्य साधत ऐतिहासिक वास्तूंवर गुलाबी, जांभळ्या रंगाची रोषणाई केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Ajit Pawar breaking news Coranavirus in Mumbai Coronavirus in India Coronavirus In Maharashtra Coronavirus Pandemic Coronavirus updates COVID-19 International Women's Day International Women's Day 2021 Jagtik Mahila Din Latest Marathi News Live Breaking News Headlines Maharashtra Budget 2021 Maharashtra Budget Session 2021 maharashtra news Marathi News New Coronavirus Strain Petrol-Diesel Rate अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन 2021 कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस भारत कोरोना व्हायरस महाराष्ट्र कोविड-19 जागतिक महिला दिन 2021 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ताज्या बातम्या नवीन कोरोना व्हायरस पेट्रोल डिझेल दर बजेट सेशन ब्रेकिंग न्यूज मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र सरकार लाईव्ह ब्रेकिंग न्यूज


Share Now