इंदोरमध्ये आज 45 नवे कोरोना रुग्ण; 8 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

अखेर लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला. परिणामी अनलॉक 1 सुरु झाला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मिशन बिगिनिंग अगेन म्हणत पुनश्च हरी ओम हा नारा दिला. त्यानुसार ठप्प झालेले राज्य हळुहळू पुन्हा एकदा सुरु होत आहे.

09 Jun, 05:15 (IST)

इंदोरमध्ये आज 45 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

09 Jun, 04:12 (IST)

दिल्लीत आज 1,007 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 29,943 वर पोहोचला आहे.

 

09 Jun, 03:42 (IST)

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आज दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 1314 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

09 Jun, 03:13 (IST)

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांची परिक्षा घेण्यासाठी भोपाळ येथील शाळेत आज निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

09 Jun, 02:36 (IST)

जम्मू-काश्मीरमध्ये 198 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील 33 रुग्ण हे जम्मूमधील असून 165 रुग्ण हे काश्मीर मधील आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये 4285 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

09 Jun, 02:29 (IST)

राजस्थान येथे कोरोनाचे आणखी 277 रुग्ण आढळून आल्याने आकडा 10876 वर पोहचला आहे.

09 Jun, 02:09 (IST)

मुंबईत  कोरोनाचे नवे 1311 रुग्ण आढळून आल्याने आकडा 50,085 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

09 Jun, 01:44 (IST)

हरयाणा येथे कोरोनाचे नवे 406 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4854 वर पोहचला आहे.

09 Jun, 01:21 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 2553 रुग्ण आढळले तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे  राज्यातील COVID19 चा आकडा 88,528 वर पोहचला

09 Jun, 01:12 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे नवे 477 रुग्ण आढळून आल्याने आकडा 20,574 वर पोहचला आहे.

09 Jun, 24:59 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाच्या नव्या 1562 रुग्णांची भर पडल्याने आकडा 33229 वर पोहचला आहे.

09 Jun, 24:49 (IST)

लॉकडाऊन दरम्यान गरिबांना त्रास सहन करावा लागणार नाही हे आम्ही सुनिश्चित केले आहे. तर आमच्या गाड्या प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी तयार आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हणत सरकारवर टीका केली आहे.

09 Jun, 24:27 (IST)

धारावीत आज कोरोनाचे नवे 12 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1924 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

09 Jun, 24:23 (IST)

मुंबईतील रुग्णालयात मृतदेहाच्या शेजारी कोरोनाचे रुग्ण असल्याचे टीव्हीवर पाहिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

09 Jun, 24:10 (IST)

हिमाचल प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा 414 वर पोहचला आहे.

08 Jun, 23:48 (IST)

केरळात आणखी 91 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1174 वर पोहचला आहे.

08 Jun, 23:34 (IST)

तेलंगणा मध्ये 10 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकन गुणांच्या आधारे त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निर्णय जाहीर केला आहे.

08 Jun, 23:24 (IST)

सुखमा जिल्ह्यातील कोंडासावली गावात नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यापूर्वी CRPF च्या जवानांकडून प्रत्येकी 5 किलोग्रॅमचे 7IED  जप्त करण्यात आले आहेत.

08 Jun, 23:03 (IST)

तेलंगणा सरकारकडून  चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे.

08 Jun, 22:37 (IST)

पश्चिम बंगाल राज्यात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला आहे.

Read more


कोरोना व्हायरस (Coranavirus)  एक भयानक संकट. त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून घेतलेल्या लॉकडाऊन त्याहून अडचणीचा. घराबाहेर पडायचे नाही. घरात हाताला काम नाही. परिणामी साठवलेली पुंजी खात बसायचे. पण, ज्यांचे पोट हातावर चालते आणि त्यांच्याकडे बचतीची म्हणून काहीएक पुंजी नाही. त्यांचे काय? हा प्रश्न सरकारवर अधिकाधिक दबाव टाकणारा ठरला आणि अखेर लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला. परिणामी अनलॉक 1 सुरु झाला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मिशन बिगिनिंग अगेन म्हणत पुनश्च हरी ओम हा नारा दिला. त्यानुसार ठप्प झालेले राज्य हळुहळू पुन्हा एकदा सुरु होत आहे.

राज्यात आजपासून सरकारी कार्यालयांसोबतच खासगी कार्यालयंही सुरु होत आहेत. सरकारच्या निर्देशानुसार कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 10% कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सरकरारने सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांतील लगबगही उठून दिसणार आहे. परिणामी हळूहळू राज्य पुर्वपदावर येऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यातच लॉकडाऊन हटविण्यास सरकारने केलेली सुरुवात पाहता कोरोना रुग्णांची वाढ होणे अपेक्षित आहे. सरकारलाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली असून कोविड सेंटर्स उभा केली आहेत.

दरम्यान, राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय सुरु होत असला तरी, सरकारने घालून दिलेली काही बंधणे, नियम उद्योगजक, व्यावसायिक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी बाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे (वर्क फ्रॉम होम) असे बंधन सरकारने ठेवले आहे. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस आणि त्यासोबतच स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळिवरील ठळक घटना, घडामोडी यांबाबत जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now