तेलंगणा मध्ये 19 हजार फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिली गेली; 8 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

09 Feb, 05:12 (IST)

तेलंगणा मध्ये 19 हजार फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिली गेली आहे.

09 Feb, 04:43 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युएस राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत प्रादेशिक समस्यांसह प्राधान्यांबद्दल  बातचीत  केली आहे.

09 Feb, 04:17 (IST)

जोशीमठ येथील तपोवन भोगद्यातील बचाव कार्याचा पहा व्हिडिओ

09 Feb, 04:05 (IST)

दलितांची वरात आढवणाऱ्या 8 जणांवर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंदसौरच्या एसपींनी दिली आहे. गुराडीया येथून माहिती मिळाली होती की काही लोकांनी दलितांची वरता आडवली होती. या वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरात काढून दिली. या घटनेत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09 Feb, 03:55 (IST)

केंद्र सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय. त्यात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या सेलिब्रिटींची दिशाभूल होत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे.

09 Feb, 03:28 (IST)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 9 फेब्रुवारीला मंत्रीमंडळाचा विस्तार करणार  आहेत.

09 Feb, 03:05 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 328 रुग्ण आढळले असून 350 जणांना  डिस्चार्ज  दिला गेला आहे.

09 Feb, 02:44 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी World Sustainable Development Summit 2021  चे उद्घाटन येत्या 10 फेब्रुवारीला करणार आहेत.

09 Feb, 02:28 (IST)

जोशीमठ येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बचावकार्यासाठी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ITBP, NDRF,SDRF, पोलिसांसह अन्य कंपन्यांची बैठक बोलावली आहे.

09 Feb, 02:03 (IST)

उत्तराखंड मध्ये197 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून दिली गेली आहे.

09 Feb, 01:46 (IST)

उत्तराखंड चमोली येथून 26 मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून अद्याप 171 जण बेपत्ता आहेत.

09 Feb, 01:36 (IST)

चमोली येथून 24 जणांचे विविध ठिकाणाहून मृतदेह ताब्यात घेतल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

09 Feb, 01:13 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 2216 रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात 15 जणांचा बळी गेला आहे.

09 Feb, 24:47 (IST)

देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 60,35,660 जणांना कोरोनाची लस दिल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

09 Feb, 24:13 (IST)

केंद्र सरकारच्या MSP वरुन राकेश टिकैत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

08 Feb, 23:48 (IST)

उत्तराखंड मध्ये NDRF, SDRF आणि जवानांनकडून संयुक्तपणे बचाव कार्य सुरु असल्याची मुख्यमंत्री टीएस रावत यांनी माहिती दिली आहे.

08 Feb, 23:31 (IST)

केरळात कोरोनाचे आणखी 3742 रुग्ण आढळले असून  9,02,627 जणांची प्रकृती सुधारली  आहे.

08 Feb, 23:10 (IST)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत जोशीमठ येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहचले आहेत.

08 Feb, 22:55 (IST)

उत्तर प्रदेशात 30 वर्षाच्या एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती बायकोसह लहान मुलीची हत्या केली आहे.

08 Feb, 22:40 (IST)

बिहार पोलिसांकडून 265 किलोचा चरस जप्त करण्यात आला आहे.

Read more


उत्तराखंड मध्ये जोशी मठ परिसरामध्ये काल हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भागात धौलीगंगा नदीवरीला ऋषी गंग़ा पॉवर प्रोजेक्टवर नुकसान झालेले आहे. यामध्ये 130 पेक्षा अधिक लोकं अडकली आहेत. त्यांना बचावण्यासाठी आयटीबीपी जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या बोगद्यामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

दरम्यान जगभरात भारताकडून लस पोहवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून Barbados & Dominica मध्ये लसी रवाना झाल्या आहेत. भारतामध्येही 55 लाखापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

मिरारोड परिसरामध्ये आज मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. ही आग शांती गार्डन परिसरात लागली होती. दरम्यान सिलेंडरच्या गाड्या देखील भरलेल्या असलेल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा स्फोट झाला आहे मात्र आता आग नियंत्रणामध्ये आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now