7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाचा आकडा किती? सरकार या तारखेला घोषणा करण्याची शक्यता

त्यामुळे वाढीव पगाराचा आकडा जाहीर करुन या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच 'अच्छे दिन'ची खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

(संग्रहित, संपादित प्रतिमा)

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने कामाला लागले आहे. त्यासाठी सातव्या वेतन आयोगनुसार वाढलेल्या पगाराची रक्कम शक्य तितक्या लवकर जाहीर करण्यचे सरकारचे प्रयत्न आहेत. केंद्रसरकारच्या कक्षेत सुमारे ५० लाख कर्मचारी येतात. त्यामुळे वाढीव पगाराचा आकडा जाहीर करुन या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच 'अच्छे दिन'ची खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात केंद्र सरकार येत्या ११ डिसेंबरला मूळ वेतन आणि सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे वाढीव वेतन याचा अकडा जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान केंद्र सरकारने मात्र याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, सरकारने कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची घोषणा करेन. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे की, सातव्या वेतन आयोगानुसार सरकार जी वेतनवाढ देत आहे ती पुरेशी नाही. (हेही वाचा,'ईपीएफओ'मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांचे मूळ वेतन वाढविण्यात यावे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८००० रुपये झाले आहे. तर, फिटमेंट फॅक्टरही २.५७ पटीने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ वेतनात वाढ करुन ते २६,०००रुपये केले जावे अशी मागणी केली आहे. तर, फिटमेंट फॅक्टरमध्यही वाढ करुन तो ३.६८ पटींनी वाढवावा असे त्यांचे म्हणणे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif