7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगारात होणार भरघोस वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाने असे म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना 2 जानेवारी ते 30 जून दरम्यान प्रमोशन मिळाले आहे त्यांच्या पगारात पुढील वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2020 मध्ये वाढ होणार आहे.
सातव्या वेतन आगोयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाने असे म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना 2 जानेवारी ते 30 जून दरम्यान प्रमोशन मिळाले आहे त्यांच्या पगारात पुढील वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2020 मध्ये वाढ होणार आहे. नुकत्याच केंद्रीय आर्थिक मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देत असे म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
तर 2 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्याचे जाहीर केले होते. त्यांना आता 1 जानेवारी पासून पगारात वाढ करुन देण्यात येणार आहे. ऑल इंडिया ऑडिट अॅन्ड अकाउंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी हरिशंकर तिवारी यांच्या मते, ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी 10, 20 किंवा 30 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना प्रमोशन देण्यासह पगारात वाढ होणार आहे. पगारातील वाढ 15 ते 20 हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे. तसेच नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि बेसिक सॅलरीमध्ये ही बंपर वाढ होणार आहे.केंद्रीय कर्मचारी गेल्या काही काळापासून त्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये 8 हजार रुपयांनी वाढ करावी अशी मागणी करत आहेत. त्यामुळे जर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार वाढ केल्यास त्यांची बेसिक सॅलरी 26 हजार रुपये प्रति महिना होणार आहे. त्याचसोबत महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.(7th Pay Commission News: दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यपकाच्या 89 पदांसाठी भरती, 57 हजार रुपयांचा पगार कमवण्याची नामी संधी; वाचा सविस्तर)