7th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस वेतन, जाणून घ्या अधिक

यापूर्वी महागाई भत्ता आणि नंतर HRA व TA प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात त्यांना पुन्हा एकदा गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

7th Pay Commission:  केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून खुशबर मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महागाई भत्ता आणि नंतर HRA व TA प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात त्यांना पुन्हा एकदा गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. खरंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. यापूर्वी 206 मध्ये फिटमेंट फॅक्टकर वाढवण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात 7वे वेतन आयोग सुद्धा लागू करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा कमीत कमी 6 हजार रुपयांवरुन थेट 18 हजार रुपये झाली होती. आता सरकार 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनात पुन्हा वाढ होऊ शकते. सुत्रांनुसार, वर्षाच्या सुरुवातीला केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते. फिटमेंट वाढवण्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी वेतनात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

फिटमेंट फॅक्टरमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडपट वाढ होते. 7व्या वेतन आयोगाच्या सिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतन भत्ता आणि बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टर नुसार ठरवली जाते.(LIC IPO: एलआयसीचा आयपीओ आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा)

कमीत कमी वेतन गणित-

>>कमीत कमी बेसिक सॅलरी: 18,000 रुपये

>>भत्ता सोडून वेतन: 18,000X2.57= 46,260 रुपये

>>3% च्या आधारावर 26000X3 = 78000 रुपये

>>एकूण वाढ = 78000-46,260 =31,740

म्हणजेच एकूण मिळून कर्मचाऱ्यांना वेतनात 31,410 रुपयांची वाढ होणार आहे. हे गणित कमीत कमी बेसिक सॅलरीवर करण्यात आले आहे. अधिकाधिक वेतन असणाऱ्यांना अधिक याचा फायदा होणार आहे.(Amazon Fined: ॲमेझॉन कंपनीस 202 कोटी रुपयांचा दंड, CCI कडून Future संबंधित रिटेल व्यवहारही स्थगित)

खरंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाकडून त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तो 2.57 टक्क्यांवरुन 3.68 टक्के करावी. अशी अपेक्षा आहे की, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होण्याऱ्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर संदर्भात निर्णय  होऊ शकतो. यानंतर कर्मचाऱ्यांच्या कमीत कमी वेतनात मोठी वाढ होऊ शकते.