PIB चे प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल के एस धतवालिया यांना कोरोना विषाणूची लागण; 7 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

08 Jun, 05:12 (IST)

PIB चे प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल के एस धतवालिया यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आले आहे.

08 Jun, 04:43 (IST)

आज अभिनेता सोनू सूदने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्याने, 'शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहोचेपर्यंत मदत करीत राहणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तो पुढे म्हणाला,'काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व पक्षांनी आम्हाला पाठींबा दर्शवला आहे त्या सर्वांचे आभार.'

08 Jun, 04:16 (IST)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या सामाजिक कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, सोनू सूदने आज उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यामुळे अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

08 Jun, 04:07 (IST)

कराचीमधील लिआरीच्या कालारी भागात 2 इमारती कोसळल्या असून आतापर्यंत 4 जखमींना ढिगातून बाहेर काढण्यात आलं आहे.

 

08 Jun, 03:54 (IST)

ओडिशा सरकारने महत्वाचा निर्णय घेत, सर्व धार्मिक स्थळे/सार्वजनिक ठिकाणे 30 जून, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे, तसेच शॉपिंग मॉल्स देखील या कालावधीत बंद राहतील असे सांगितले आहे.

08 Jun, 03:40 (IST)

परदेशी लोकांच्या प्रवेशावरील निर्बंध कमी केल्यावरच आंतरराष्ट्रीय विमाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली.

08 Jun, 03:15 (IST)

सिंध प्रांतामध्ये 1,744 नवीन कोविड- 19 घटनांची नोंद झाली आहे, अशाप्रकारे पाकिस्तानची कोरोना व्हायरस रुग्णसंख्या 1,00,687 वर पोहचली आहे. यामध्ये एकूण 2,018 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 33,465 लोक बरे झाले आहेत. 

08 Jun, 02:50 (IST)

अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, जियो प्लॅटफॉर्ममधील 1.16 टक्के भागभांडवलासाठी 5,683.50 कोटींची गुंतवणूक करणार.

 

08 Jun, 02:19 (IST)

गौतम बुद्ध नगर येथे आणखी 41 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 632 वर पोहचला आहे.

08 Jun, 02:14 (IST)

हरियाणा येथे आणखी 496 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 4448 वर पोहचला आहे.

08 Jun, 02:02 (IST)

उद्यापासून धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट हॉटेल्स आणि ऑफिसेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

08 Jun, 01:41 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे नव्या 1421 रुग्णांची भर तर 61 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे COVID19 चा शहरातील आकडा 48549 वर पोहचला आहे.

08 Jun, 01:39 (IST)

महाराष्ट्रात जवळजवळ 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

08 Jun, 01:25 (IST)

महाराष्ट्र  राज्यातील 60 तुरुंगामधील 38000 कैद्यांपैकी 9671 कैद्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

08 Jun, 24:54 (IST)

मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 13  रुग्ण आढळून आल्याने आकडा 1912 वर पोहचला आहे.

08 Jun, 24:47 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 3007 रुग्ण आढळले तर 91 जणांचा बळी, राज्यातील COVDI19 चा आकडा 85, 975 वर पोहचला आहे.

08 Jun, 24:31 (IST)

पंजाब येथे गेल्या 24 तासात  आणखी 93 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 2608 वर पोहचला आहे.

08 Jun, 24:23 (IST)

तमिळनाडू येथे आणखी 1515 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 31667 वर पोहचला आहे.

08 Jun, 24:03 (IST)

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक झाल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्यांची निवास स्थानी भेट घेतली.

07 Jun, 23:51 (IST)

कर्नाटक: कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले आहे.

Read more


मुंबईतील कांजूरमार्ग (Kanjurmarg), घाटकोपर (Ghatkopar), विक्रोळी (Vikroli) , पवई (Powai) या परिसरातून गॅस गळती झाली असून या परिसरात त्याचा वास येत असल्याच्या काही तक्रारी शनिवारी रात्री नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मुंबई मनपाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र रात्रभराच्या तपासानंतर मुंबईत कुठेही गॅस गळती (Gas Leakage) झाली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ज्या भागातून या तक्रारी आल्या तेथे अग्निशमन दलाच्या 17 यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार या परिसरांत तपास सुरु होता. मात्र येथे कुठेही वायुगळती न झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,14,073 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now